(सचिन वाघमोडे)
गेल्या पंधरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत सोलापूर येथील इनामदार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या कृषी पदवीधर याच्या मदतीला कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना मैदानात उतरली शेतात काम करत असताना सर्प दंश झाल्याने गणेश जाधव हा कृषी पदवीधर मृत्यूच्या दाढेत गेला त्याच्यावर उपचार चालू झाले परंतु त्याच्या कुटुंब आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला होता तरी या परिस्थितीत युवाशक्ती परिवाराने त्यांना हतबल होऊ दिले नाहीयाप्रसंगी करमाळ्याचे तालुकाध्यक्ष रोहित माने व इंदापूरचे तालुका अध्यक्ष वैभव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत कृषी पदवीधराला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहीम उघडली याला राज्यभरातील कृषी पदवीधरांनी समर्थन देत अवघ्या दोन दिवसांत
एक लाख रुपयेइतका धनादेश गोळा केला संघटनेने दिलेल्या हाकेला राज्यभरातून साथ मिळाली हा कृषी पदवीधरांचा संघटनेवर असलेला विश्वास आहेहा संपूर्ण धनादेश आज कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष जयदीप दादा ननवरे कार्याध्यक्ष प्रवीण भैय्या आजबे यांच्या उपस्थितीत गणेश जाधव यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला
तसेच गणेश जाधव यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून विचारपूस करण्यात आली व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक धीर देण्यात आला व महाराष्ट्रातील संपूर्ण अग्रिकॉस परिवार कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या मार्फत गणेश जाधव यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे याची जाणीव यावेळी करून देण्यात आली
तसेच रोहित माने वैभव पाटील या आमच्या युवाशक्ती परिवाराच्या शिलेदारांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे
लवकरच सर्वांच्या आशिर्वादाने आपला कृषी मित्र गणेश जाधव हा बरा होईल व पुन्हा त्याच जोमाने त्यात जोशाने आणि नव्या उमेदीने काळ्याआईच्या सेवेत पुन्हा रुजू होईलआजच्या या प्रसंगी संघटनेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननावरे कार्याध्यक्ष प्रवीण भैय्या आजबे इंदापूर तालुका अध्यक्ष रोहित पाटील करमाळा तालुका अध्यक्ष रोहित माने माढा तालुका अध्यक्ष शुभम लोकरे पाटील युवाशक्ती परिवारातील आदित्य पाटणकर रंजीत गंभीरे रंजीत कदम ,गिरीश बनकर व किरण जाधव हे उपस्थित होते.