साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा
उस्मानाबाद,दि.14 :
राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे येत्या शनिवार दि. 16 जानेवारी 2021 आणि रविवार, दि.17 जानेवारी 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम असा दि.16 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी तुळजापूर येथे सोलापूर येथून हेलिकॉप्टरने आगमन आणि तुळजापूर येथून मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण. उस्मानाबाद येथे सायंकाळी 5 ते 7.00 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील नगरपरिषद आणि नगर पंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर)अंमलबजावणी तसेच विकास कामांचा आढावा ते घेतील.यावेळी जिल्हाधिकारी,संबंधित मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रतिनिधी उपस्थित असतील. सायंकाळी 7.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातच पत्रकार परिषद होईल. श्री.शिंदे रात्री उस्मानाबाद येथे मुक्काम करतील.
नगरविकास मंत्री श्री.शिंदे हे 17 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता उस्मानाबादच्या शासकीय विश्रामगृहातून मोटारीने तुळजापूरच्या भवानीमंदीराकडे प्रयाण करतील. सकाळी 8.50 ते 9.15 या वेळेत तुळजाभवानीचे मंदीरात दर्शन घेतील आणि सकाळी 9.25 वाजता तुळजापूरहून हेलिकॉप्टरने ठाण्याकडे प्रयाण करतील.