मागील वर्षी लॉकडाऊनवेळी हजारो प्रवासी मजुरांच्या मदतीला धावून जाणारा अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे.शुक्रवारी, त्याने सोशल मीडियावर लिहिलंय, “मी सकाळपासून माझा फोन ठेवलेला नाही. देशभरातून हॉस्पिटल, बेड्स, औषधे, इंजेक्शन्साठी हजारों कॉल आले आहेत आणि आतापर्यंत मी अनेकांना त्या गोष्टी उपलब्ध करून देऊ शकलो नाही. मला खंत वाटत आहे. ही स्थिती खूप भीतीदायक आहे. प्लीज घरात राहा, मास्क घाला आणि स्वत: ला संक्रमणापासून वाचवा.”
next post