26.3 C
Solapur
September 29, 2023
कविता 

पाप- पुण्य

काय पुण्य,काय पाप
कर्मा-कर्माचे विधान

जीवन असे जगा की
पाप पुण्याचा हिशोब करा

आजचा दिवस उद्या नसतो
उदयाचा दिवस परवा नसतो

सगळ काही इथच असत
आपण मात्र इथ नसतो

नको चोरी, लबाड़ी
नको फसवणूक

नका करू कोणाची
संकटात अडवनुक

पशु,पक्षी,प्राण्यावर
करा दया, भूतदएपेक्षा

पुण्य नाही पहा
वृद्धाप्रमानेच वृक्षांचा सांभाळ

हेच खरे पुण्य महान
करुंन कार्य चांगले

मिळवा पुण्याच्या राशी
पाप पुण्याचा घालून मेळ

असा हा चाले
जीवनाचा खेळ।

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर

Related posts