पंढरपूर :
मुरूम वाहतूक करणाऱ्या टिपरने एका मोटारसायकलस्वारास पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये वाखरी येथील भागवत नागणे (वय 65) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
हा अपघात आज (मंगळवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाखरी जवळच्या आश्रम शाळेसमोर घडला.
पंढरपूर – पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. कामावर मुरूम वाहतूक करणाऱ्या भरधाव टिपरने (एम एच13 सीयू 4506) ने भागवत कृष्णा नागणे यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये भागवत नागणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर टिपरचा चालक पळून गेला असून, ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.