hacklink hack forum hacklink film izle hacklink chicken roadrocket playrocket playlunchtime resultsdeneme bonusujojobetjojobetbetciosuperbetinsuperbetin girişsuperbetinsuperbetin girişsuperbetinsuperbetin girişjojobetholiganbetjojobet
महाराष्ट्र

रशियाकडून Su-57 स्टेल्थ फायटर जेटबाबत भारताला मोठी ऑफर

रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीच्या (fifth-generation) Su-57 स्टेल्थ फायटर जेटचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याबाबत ऑफर दिली आहे. तसेच रशिया भारताच्या फायटर एअरक्राफ्ट अवश्यकतेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे,असेही एका रशियन अधिकाऱ्याने सांगितले आहे.दुबई एअर शो २०२५ च्या पार्श्वभूमीवर बोलताना, रशियाच्या सरकारी मालकीचे डिफेन्स कॉन्ग्लोमेरेट रोस्टेक (Rostec) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्गेय चेमझोव्ह (Sergey Chemezov) म्हणाले की, देशाचे भारताबरोबर मजबूत संबंध आहेत. तसेच रशियाची संरक्षण गरजांसाठी भारताला पाठिंबा देण्याची तयारी आहे असेही ते पुढे बोलताना म्हणाले.“भारत आणि रशिया हे अनेक वर्षांपासून भागीदार आहेत. जेव्हा भारतावर निर्बंध लादले गेले होते तेव्हा देखील आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला होता. आजही आम्ही तोच मागील काळातील दृष्टीकोन ठेवतो, आणि भारताला गरज असलेली सर्व लष्करी उपकरणे पुरवतो आणि आमच्यातील विकसित होत असलेल्या सहकार्यामध्ये आम्ही परस्पर हितांची काळजी घेतो,” असे सर्गेई चेमेझोव्ह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.भारताकडून अतिरिक्त S-400 सिस्टीम किंवा Su-57 यांच्याबद्दल कोणतेही अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असा रोस्टेकचे सीईओ म्हणाले, “भारताबरोबर आमचे संबंध मजबूत आहेत आणि भारताला जे काही हवे असेल, त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे रशियामध्ये असताना हे विधान आले आहे. रशियामध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेय लावरोव्ह यांची भेट घेतली आणि एससीओ (SCO) हेड ऑफ गव्हर्नमेंट शिखर परिषदेत सहभाग घेतला.Su-57 हे एक ट्विन-इंजिन, फिफ्थ जनरेशन स्टेल्थ मल्टिरोल लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या एफ-३५ स्टेल्थ फायटर जेट्सचा मुकाबला करण्यासाठी रशियाने हे तयार केले आहे. हे विमान हवेतील आणि जमिनीवरील अशा दोन्ही लक्ष्यांचा अचूक भेद करण्याच्या क्षमतेसह येते.

Related posts