पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे रणनीतिकार म्हणून काम पाहिलेल्या प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या कामातून संन्यास घेतला आहे. इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भावना बोलून दाखवली.
प्रशांत किशोर म्हणाले की, मी जे निवडणूक व्यवस्थापनाचे काम करत आहे ते पुढे सुरू ठेवण्याची इच्छा नाही. मी भरपूर काम केले आहे. जीवनात थोडी विश्रांती घेण्याची आणि काहीतरी करण्याची मला वेळ हवी आहे. हे काम सोडण्याची माझी इच्छा आहे, असं त्यांनी व्यक्त केलं.
प. बंगाल विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना किशोर म्हणाले की, या निवडणुकीचा निकाल तृणमूल काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी वाटला तरी तो एक मोठा संघर्ष होता. तृणमूलच्या नेत्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यांचे अभिनंदन. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे, असंही त्यांनी सांगितले.
