लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद
================================================================
आज 20 डिसेंबर स्वच्छतेचे पुजारी, स्वच्छता हेच देव मानणारे, स्वच्छतेसाठी आपले जीवन वाहून घेणारे, स्वच्छतेबद्दल समाजात जनजागृती करणारे, स्वच्छता देवीची अविरत उपासना करणारे, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा आज स्मृतिदिन आहे त्या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा आजच्या या दिनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन आपण लहानपणापासून ऐकलेले आहे की गावा गावाची स्वच्छता रस्त्याची स्वच्छता नाल्यांची स्वच्छता स्वतः निस्वार्थ वृत्तीने करणारे व नंतर समाजाला सांगणारे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा होय.
नुसतंच स्वतःला संत म्हणवून घेणारे ते नव्हते त्याकाळी गावोगावी शहरोशहरी जाऊन आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य गाडगेबाबांनी केलेले आहे स्वच्छतेचे महत्व आरोग्य सांभाळण्याचे सूत्र माणुसकी जपण्याचे सूत्र पशुपक्षी प्राण्यावर दया करण्याचा व त्यांचा योग्य सांभाळ करण्याचा संदेश तसेच भुकेल्या ची भूक जाणा तहानलेल्या ची तहान जाणार असा संदेश आपल्या कीर्तनातून देत असत व समाज जागृती करीत असतात एवढेच नव्हे तर स्वच्छतेची सुरुवात आपल्या स्वतःपासूनच करीत असत गळ्यामध्ये एक मडकं बांधलेलं हातामध्ये एक झाडू घेतलेला डोक्याला रुमाल बांधला साधारण वेशात लागले स्वच्छतेच्या कार्याला त्यांचे ते रूप बघूनच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले कोणी जर त्यांना विचारलं की बाबा गळ्यामध्ये गाडगं का बांधला आहे ते सांगत रस्त्यावर थुंकणे रस्ता घाण करणे योग्य नाही जर थुंकायचे असेल तर मडक्यात थूंकायचे त्यांच्या गळ्यामध्ये सतत गाडगे बांधलेले असायचे म्हणून त्यांना गाडगेबाबा असे म्हणू लागले त्यांच्या स्वच्छतेच्या मंत्रांनी अख्खा गाव हळूहळू जागा होत असे बाहेर गावाहून आलेला एक बाबा आपले गाव स्वच्छ करीत आहे हे दृश्य बघून गावातील लोकांना लाज वाटत असे लगेच ते लोक त्यांना साथ देत असत व झाडू घेऊन त्यांच्या बरोबर सहकार्य करीत असत असे करता करता अख्खा गाव गोळा होईल.
दिवसभर स्वच्छतेचे कार्य केल्यानंतर रात्रीच्या वेळी चौकामध्ये किंवा मंदिरामध्ये त्यांचे कीर्तन सुरू होई गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे म्हणत त्यांचे कीर्तन सुरू होई विविध सामाजिक विषयावर सामाजिक समस्या वर समाजाच्या कल्याणासाठी ते कीर्तन करीत असत जे का रंजले गांजले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा जो रंजल्या गांजल्या ची सेवा करतो गोरगरिबांची सेवा करतो त्यांना मदत करतो आजारी व्यक्ती रुग्णांची सेवा करतो तोच खरा देव असतो त्यांचे कीर्तन आगळेवेगळे संवाद रुपी असे संवादाच्या माध्यमातून ते कीर्तन करीत असत कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारीत असत व त्यांच्याकडूनच त्या प्रश्नांची उत्तरे शोधत असत त्यांच्या विचारावर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा प्रभाव दिसून येतो सत्य अहिंसा परमो धर्म मानणारे सत्याच्या रस्त्यावर चालणारे पशुपक्षी प्राण्यावर दया करणारे त्यांचे कीर्तन कधी संपे हे लोकांच्या लक्षात सुद्धा येत नसे अशा पद्धतीने गावातील सगळी लोक त्यांना सहकार्य करीत असत कीर्तनातून अनेक विषयावर प्रबोधन होत असे त्यांचा प्रभाव विचारांचा प्रभाव लोकांवर पडत असे सगळी लोक एकत्र येऊन एकतेचे महत्त्व त्यांना पटत असे
असे कार्य करत करत संत गाडगेबाबा त्यांच्या कार्याने राष्ट्रसंत बनले समाजाचे आदर्श बनले त्यांना मूर्तिपूजा फोटो पूजा किंवा दगडाची पूजा मान्य नव्हती ते माणसात देव शोधणारे संत होते ते मनात प्रत्येक जीवा जीवा त देव आहे माणसात देव शोधणारा संत म्हणून ते ओळखले जात असत ते अंधश्रद्धा मानत नसत पूजा करायचीच असेल तर माणसांची करा त्यांची भूक ओळखा त्यांना मदत करा अन्नदान करा समाज सेवा करा ही त्यांची शिकवण होती देशाच्या स्वच्छतेचा खरा पाया संत गाडगेबाबांनी रचला होता ते म्हणतात पशु पक्षी प्राणी सुद्धा आपली स्वच्छता आपण स्वतः करतात शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी गाडगेबाबांनी स्वच्छतेचा विचार पेरला त्या विचारांना फुलवले व समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत रामदास स्वामी अशा अनेक संतांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेलं आहेच संत गाडगेबाबा हे कर्मयोगाचा कार्य करीत होते त्यांच्या विचारावरच आधुनिक काळात स्वच्छता अभियान पुढं आलं गाडगेबाबा स्वच्छतेचे जनक आहेत देशाचे सन्माननीय पंतप्रधान सुद्धा हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे कार्य करतात हेच संत गाडगेबाबांच्या विचारांचे खरे यश आहे स्वच्छ भारत सुंदर भारत या नावाखाली देशात स्वच्छतेचे कार्य सुरू झाले गावोगावी गल्लोगल्ली घराघरातून शौचालय बांधणे व सर्वांनी स्वच्छतागृहाचा वापर करणे यासाठी दंडक सुद्धा निघाले तसेच नद्या स्वच्छ करणे किल्ले स्वच्छ करणे आपला परिसर स्वच्छ करणे अशा प्रकारचे स्वच्छ भारत अभियान देशभर राबविण्यात येऊ लागले याचे खरे श्रेय जाते ते संत गाडगेबाबांनी पेरलेल्या स्वच्छतेच्या विचारांना हेच त्यांच्या कार्याचे खरे यश आहे आजच्या या स्मृतिदिनी ने पुनश्च एकदा संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन।
धन्यवाद . . . !