महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी टेनिस खेळताना ते पडल्याने त्यांना मुका मार लागला होता. मार लागलेल्या जागी त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर शनिवारी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना लवकरच घरी सोडणार असल्याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.
शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले होते. मात्र राज ठाकरे यांना शनिवारी सकाळी १० वाजता दाखल करण्यात आले. त्यांच्या सर्व चाचण्या केल्यानंतर त्यांच्यावर दुपारी ३ च्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणता दीड वर्षांपूर्वी राज ठाकरे हे लॉग टेनिस खेळतांना पडले होते. त्यावेळी हाताला फ्रॅक्चर तसेच कमरेखाली मुकामार लागला होता.
यानंतर हाताचे फ्रॅक्चर बरे झाले. मात्र कमरे खालील मुका मार असलेल्या जागी रक्त साखळल्याने दुखणे पुन्हा उफाळले. त्यामुळे त्याजागी छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. विनोद अग्रवाल, डॉ. आनंद उतुरे आणि डॉ. जलील पारकर या टीमने ही शस्त्रक्रिया केली.

Related posts