26.2 C
Solapur
September 21, 2023
दक्षिण सोलापूर

टाकळी येथे महामानवांना अभिवादन करुन प्रचाराचा शुभारंभ.

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक ४ श्री चौडेश्वरी ग्रामविकास पॅनलचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर बसवराज गायगवळी यांच्या प्रचाराचे शुभारंभ महापुरूषांना अभिवादन करुन करण्यात आले.यंदाच्या निवडणुकीत सुशिक्षित व पदवीधर उमेदवार टाकळी ग्रामपंचायतीत निवडुन जाणार असल्याने आपल्या वाॅर्ड क्रमांक ४ मधुन माझ्यासारख्या चळवळीतील व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारास मतदारांनी संधी द्यावी असे नम्र आवाहन केले.

२६ जानेवारी अथवा १५ ॲागस्टला पांढरे कपडे घालुन गोळ्या बिस्किट वाटप करणाऱ्या उमेदवाराला निवडुन न देता ग्रामपंचायतीच्या काराभाराबद्दल माहिती असणाऱ्या, गावच्या सर्वांगीण विकासाला महत्व देणाऱ्या व सर्वांच्या अडीअडचणीला धावुन जाणाऱ्या उमेदवाराला जनतेनी संधी द्यावे असे मत यावेळी व्यक्त केले. यावेळी बोलताना उमेदवार चंद्रशेखर गायगवळी यांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असो अथवा कोळी समाजाच्या न्याय हक्काचा प्रश्न असो वा वडार समाजाचा प्रश्न असो प्रत्येक समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी चळवळीच्या माध्यमातुन आवाज उठवणार्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनतेनी एक संधी द्यावे.

मतदारांनी दिलेल्या संधीचे मी विकासाच्या दृष्टिकोनातून सोने करुन दाखवेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रचार शुभारंभास सर्व समाजातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts