उमरगा

उमरगा येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ ; पहिली लस इंडियन मेडिकल असोशिएशन सचिव डाॕ.प्रशांत मोरे यांनी घेतली.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा
उमरगा “कोरोना” (कोवीड १९) महामारीला हरविण्यासाठी कोविन लस उमरग्यात दाखल झाल्यानंतर आज दि. १६ जानेवारी वार शनिवार पासून लसीकरणास सुरवात करण्यात आली. उप जिल्‍हा रूग्‍णालयात याचा शुभारंभ झाला असून, पहिली लस इंडियन मेडिकल असोशिएशन सचिव डाॕ.प्रशांत मोरे यांनी घेतली.

धाराशिव जिल्हयात सर्वप्रथम कोरोना रुग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता. कालांतराने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली, ती दोन हजारापेक्षा अधिक झाली. अशा कठीण काळात शासकिय रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांची देखरेख केली. शासकिय आणि खासगी रुग्णालयातिल डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, त्यावर मात करून पुन्हा रुग्णसेवेत ही मंडळी कार्यरत राहिली. राज्य सरकारने कोविड लसीकरणाची मोहिम हाती घेतली. शहरातील उपजिल्हा रुग्णालयासाठी सहाशे कोविन लस उपलब्ध झाले आहेत. नोंदणी केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. एस.एम.एस पाठविलेल्या शंभर जणांना शनिवारी लस टोचण्याचा शुभारंभ करण्यात आला.

दुपारपर्यंत २५ जणांना लस देण्यात आली. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक बडे यांच्या उपस्थितीत डॉ. मोरे यांना कोविनची टस देण्यात आली. “कोरोना”(कोविड १९) या विषाणूला हरविण्यासाठी राज्‍यभरात कोरोना लसीकरणास सुरवात करण्यात आली. त्‍या अनुषंगाने जिल्‍ह्‍यात कोविन लस दाखल झाली आहे. आज दि.१६ रोजी सकाळी लसीकरण मोहिमेस सुरवात करण्यात आली. लस घेतल्यानंतर आर्धातास निरीक्षण कक्षात निगराणी खाली ठेवण्यात आले होते.

यावेळी धाराशिवचे निवासी वैद्यकिय अधिक्षक डॉ. गोस्वामी,अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पांचाळ, डॉ. प्रताप शिंदे, डॉ. वसंत बाबरे, नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. दिपक पोफळे, डॉ. उदय मोरे आदी उपस्थित होते

Related posts