शंभर टक्के कर्जमाफ झाल्याशिवाय शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी केले.
शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने वाकडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ॲड. काळे बोलत होते. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, रुपेंद्र काले, शिवाजी लहारे, गणेश साखर कारखान्याचे संचालक आलेश कापसे, साहेबराव चोरमल, ॲड. सर्जेराव घोडे, ॲड. प्रशांत कापसे, सचीन वेताळ, सुनिल आसने, बाबासाहेब वेताळ, अशोक गुळवे, शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष शरद आसने, अभिषेक वेताळ, रविंद्र पवार, बाबासाहेब आसने, सुनिल आसने, सुजीत बोडके, सावळेराम आहेर, दत्तात्रय कोते, ज्ञानेश्वर सोडणार, रामदास तरकसे, नानासाहेब जवरे, विठ्ठलराव भालेराव, यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्यांनी कुठलेही कर्ज भरू नये, शंभर टक्के कर्जमुक्ती केल्याशिवाय शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील अकारी पडीत शेतकरी यांच्या जमीन मिळवून देण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय करून न्याय द्यावा, नागपूरला यासाठी जाणार आहोत. त्याआधी शेतकऱ्यांची ब्राह्मणगाव येथे पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे.राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान नुकसान भरपाई व पिक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, परंतु तरुण शेतकरी मुलांनी शेतकरी संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. वैजापूर येथील रवींद्र पवार यांनी, मराठवाड्यातील वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व पिक विमा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अजित काळे यांनी मिळवून दिल्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले.

