महाराष्ट्र

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट

ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लॉस्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहराच्या नजिक जवाहरनगर नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी एक आयुध निर्माण कंपनी आहे. या कंपनीत साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान मोठा स्फोट झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत स्फोट झाला तेव्हा 14 कामगार कार्यरत होते. कारखान्याच्या आर. के. सेक्शनमध्ये स्फोट झाला आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Related posts