सोलापूर,
दि.महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणीची निवड सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर झालेल्या “विशेष सहविचार सभेत जाहीर करण्यात आली.यात महासंघाच्या सोलापूर जिल्ह्याच्या सहसचिवपदी प्रा.डॉ.राजदत्त रासोलगीकर यांची ,जिल्हा अध्यक्षपदी प्रा. युवराज भोसले (मोहोळ) यांची निवड करण्यात आली तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश गायकवाड (पोलादपूर) यांची निवड करण्यात आली.या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भास्करराव बनसोडे,महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर,राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड,राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे,राज्य कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे ,जिल्हा सरचिटणीस रवी देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.निवड झालेल्या नवीन पदाधिकार्यांनी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना बांधणी व वाढीसाठी तन-मन-धनाने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली.
यावेळी अशोक पाचकुडवे,किशोर बनसोडे,संग्राम कांबळे,विजयकुमार लोंढे,प्रकाश साळवे,अनिलकुमार चन्ने,अमोल निकाळजे,धनाजी धिमधिमे,प्रेमचंद सावंत,अभिजित वाळके,वीरभद्र स्वामी,मल्लिकार्जून कांबळे,किशोर बनसोडे, प्रा.पी.एस.शिंदे,प्रफुल्ल जानराव,राजहंस कांबळे,शिवाजी जगताप,प्रकाश साळवे,अमोल निकाळजे,वैजीनाथ लोखंडे,दत्तात्रय शिंदे,महादेव अवताडे,तानाजी अवताडे,राजेंद्र सोरटे,रामराज भड,संदिप निस्ताने,अण्णा गवळी,सिद्धेश्वर लोखंडे,बाळासाहेब लोखंडे, गायकवाड,अनिलकुमार चन्ने,हनुमंत राऊत,विठ्ठल एकमल्ली,सिद्राम हिप्परगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.