जिल्हा प्रतिनीधी:-सलमान मुल्ला
कळंब तालुक्यातील मातंग समाजाला स्वतंत्र गाव तिथे स्मशानभुमी उपलब्ध करून देण्याची मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने कळंब येथील तहसिलदार सौ.मंजुषा लटपटे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कळंब तालुक्यातील गावांमध्ये बर्यापैकी मातंग समाज वास्तव्यास आहे.परंतु या समाजाला स्वतंत्र अशी स्मशानभुमी नसल्याने समाजातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास अंत्यविधी करणे अवघड होत आहे.तर वेळ प्रसंगी स्मशानभुमीची नोंद ७/१२पत्रकावर नसल्याने अनेक गावात अंत्यविधी करण्यासाठी मृत्यदेह ताटकाळत ठेवावा लागत आहे.
तसेच ज्या गावात स्मशानभुमी करीता जागा आहेत त्यांची ७/१२पत्रकावर नोंदी घेण्यात याव्यात, तर ज्या गावांमध्ये ७/१२पत्रकावर स्मशानभुमीच्या नोंदी असुन वहीवाटीस आहेत त्या गावात ग्रामपंचायत कार्यालयाने कुठल्याही प्रकारच्या शासकिय योजना राबविल्या नसल्याने कुठल्याही प्रकारच्या सेवा, सुविधा व शवदाहीन्या उपलब्ध नाहीत.
त्यामुळेही अंत्यसंस्कार करणे अवघड झाले आहे. तरी सदरील विषयावर तहसिलदार यांनी कळंब तालुक्यातील मातंग समाजाला गाव तिथे स्मशानभुमी उपलब्ध करुन न्याय द्यावा अन्यथा न्याय न मिळाल्यास मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, कळंब तालुकाध्यक्ष धनंजय ताटे,कचरु नवगीरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.