26.8 C
Solapur
February 29, 2024
सोलापूर शहर

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना कोरोना बाधितांवर उपचार होणार

सोलापूर –महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना(MJ PJAY) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PM JAY एकत्रितपणे शासनाने योजना कोव्हिडं19 संसर्गावर उपचार करण्यासाठी दिनांक 23 मे 2020 पासून राबविण्यास चालू केले आहे. सदरची योजना ही राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई यांच्यामार्फत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी च्या सहकार्याने चालवली जात आहे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे आहेत सदर योजनेसाठी डॉक्टर वाघमारे मोबाईल नंबर 82 75 09 58 26 हे सोलापूरचे नोडल अधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून काम करत आहेत काही शंका असल्यास यांना संपर्क साधावे सध्या या योजनेत समाविष्ट दवाखाने यांच्याकडे 31-07-2020 पर्यंत ही योजना चालू असेल. झालेल्या खर्चाची प्रतीपूर्ती विमा कंपनीकडून राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मान्यतेने केली जाते ज्या रुग्णालयाची नोंदणी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950च्या क्लाज 4 section 41AA नुसार झालेली आहे त्या रुग्णालयांनी 10% बेड राखीव ठेवून मोफत उपचार देणे आहे. आणि 10% टक्के बेड गरीब लोकांसाठी राखीव ठेवून त्यांना माफक दरात उपचार द्यावयाचे आहे.आशी माहिती कोव्हिडं19 कंट्रोलचे अधिकारी धनराज पांडे यांनी दिली.
सदर कार्यालयचा पत्ता
‘जीवनदायी भवन’ E.S.I.S रुग्णालय आवार,गणपत जाधव मार्ग मुबंई-400,018
फोन–022-24912291
ईमेल–ceo@jeevandayee.gov.in
वेबसाइट–jeevandayee.gov.in

बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ACT 1950 नुसार सोलापुरातील नोंदणीकृत रुग्णालय खलील प्रमाणे
01.सुरक्षा चारीटेबल ट्रस्ट मेडिकल अँड रीसर्च रीसर्च

  1. एम एम पटेल चारीटेबल ट्रस्ट संचलित अश्विनी ग्रामीण रुरल पटेल चारीटेबल ट्रस्ट संचलित अश्विनी ग्रामीण रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर गट नंबर 261 262 सोलापूर.
  2. सुरक्षा चारिटेबल सोसायटी संचालित श्रीमती मल्लव्वाबाई वल्याळ चॅरिटेबल डेंटल हॉस्पिटल ,गणेश पेठ सोलापूर
    04.अल फैज चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल अँड रिसर्च सेंटर,सोलापूर संचलित अल-फैज जनरल हॉस्पिटल, डॉ.अल्लमा इकबाल हॉल,80,सिद्धेश्वर पेठ सोलापूर
  3. शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय व रुग्णालय ट्रस्ट संचलित गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय (सलग्न) शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय 118/ 119 शुक्रवार पेठ, टिळक चौक, सोलापूर.
  4. मल्लिकार्जुन हेल्थकेअर अँड रिसर्च सेंटर संचलित यशोधरा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सिद्धेश्वर पेठ, जिल्हा परिषद जवळ, सोलापुर
    07.श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, होटगी रोड, दैनिक संचार जवळ,सोलापूर.
    08.पैरवी शिक्षण प्रसारक मंडळ,सोलापूर संचलित महिला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व युगधंर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर 238/1बी कोळीगिरी नगर होटगी रोड, मंजरेवाडी.
    09.लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स मधुराबाई फत्तेहचंद दमणी हॉस्पिटल,लायन्स ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय ,125 दमाणी नगर,सोलापूर
    10.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट संचलित लोकमंगल जैविक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ,नीलम नगर एम.आय.डी.सी.प्लॅट न.02 जुना कुंभारी रोड, सोलापूर.
    11.इंडियन कँन्सर सोसायटी,8389/2बी रेल्वे लाईन्स,सोलापूर.
    12.गांधींनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधींनाथा रंगजी हॉस्पिटल,13 बुधवार पेठ,सोलापूर.
    13.डॉ.कासलीवाल मेडिकल केअर व रिसर्च सेंटर,सोलापूर संचलित कासलीवाल हॉस्पिटल, वस्तूरबा मार्केटजवळ,196,बुधवार पेठ सोलापूर.
    14.धनराज गिरीजी हॉस्पिटल ट्रस्ट,4,रेल्वे लाइन्स,सोलापूर.
    सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 मे 2020 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी शासकीय,सार्वजनिक आणि खासगी रुग्णालय 80:20 प्रमाणे अंगीकृत/ अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 80 टक्के बेड हे शासकीय दराने महापालिकेच्या नियंत्रित करावयाचे आहेत व 20% बेड खाजगी रुग्णालयाने नियंत्रित करावयाचे आहेत एकूण 80 टक्के पैकी 25 टक्के बेड हे सदर योजनेत महात्मा फुले योजनेस राखीव आहेत व त्यात आठ पॅकेजेस समावेश करण्यात आलेले आहेत.सदर आठ पॅकेजची माहिती आणि उपलब्द बेडची माहिती सर्व रुग्णालयानी त्यांच्या दर्शनी भागावर ठळकपणे पहाता येईल असे लावावे.

Related posts