– कोरोना बाधित रुग्णांना गैरहजर राहून उपचार नाकारणाऱ्या चिडगुपकर हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड 19 संनियंत्रण अधिकारी...
सोलापूर, दि. 15 : कोरोना विषाणूची बाधा होऊन मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यविधी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने विहित पद्धती (प्रोटोकॉल) तयार केली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक...
गेल्या अडीच महिन्यापासून विडी उद्योग बंद असल्याने ६५ हजार महिला विडी कामगार अडचणीत आल्या आहेत , देश अनलॉक झाल्यानंतर विडी उद्योगाला परवणीगी देण्यात आलीय ,...
सोलापूर:-महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शाळा अनुज्ञापती प्रमाणपत्र नूतनीकरण अभावी दिव्यांग शाळातील कर्मचार्यांचे वेतनथांबविण्यात आले आहे.राज्यातील हजारो शिक्षक व कर्मचारी यांची उपासमार थांबविण्यासाठी त्वरित वेतन देण्याचे आदेश जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी यांना न दिल्यास लॉक डाऊन काळात बेमुदत आमरण उपोषणकरण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिलाआहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत दिव्यांग शाळांचे अनुज्ञापती प्रमाणपत्र नूतनीकरण ऑनलाईन प्रस्ताव दिव्यांगआयुक्त कल्याण कार्यालयाकडे प्रलंबित आहेत.महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे सगळीकडे शासन नियमानुसारसंचारबंदी पाळण्यात येत आहे.तरी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिव्यांग शाळांचे कर्मचारी शासनाने नेमून दिलेली कर्तव्य बजावतआहेत.तरी अशा सर्व कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2020 पासून सर्व जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांचेकडून वेतन थांबविण्यात आलेआहे.त्यामुळे हजारो शिक्षक व कर्मचारी उपासमारीच्या फेऱ्यात अडकले आहेत.कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू नये,असेमहाराष्ट्र शासनाचे आदेश असताना दिव्यांग समाज कल्याण कार्यालयाकडून प्रमाणपत्र नूतनीकरण याविषयी कोणतेही पत्र न निघाल्याकारणाने महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग शाळांमध्ये कार्यरत हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे व त्या सर्व कर्मचाऱ्यांचीउपासमार सुरू आहे.एकीकडे कोरोना महामारी ने जगभर हाहा:कार माजला असून,जगातील यंत्रांची चाके थांबली गेली आहेत.शाळाहीत्याला अपवाद नाहीत. ” दिव्यांगाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा “म्हणून काम करणारे , दिव्यांग शाळांचे कर्मचारी वेतनाविना हतबल होत आहेत. राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडविण्यात यावेत.एप्रिल पासून थकलेले वेतन त्वरीत देण्याचे आदेश राज्यातील सर्वजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना द्यावेत.तसे न झाल्यास लॉकडाउन तोडूनआमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदना मार्फत राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाच्या आयुक्तांना तसेच सोलापूरचेजिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त व जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना पाठवले आहे.या निवेदनावर महासंघाचे प्रदेशाध्यक्षअण्णासाहेब भालशंकर,राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड,उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे,जिल्हा सेक्रेटरी रविदेवकर,विजयकुमार लोंढे,संग्राम कांबळे,सुनिल सन्मुख,दाऊद अत्तार,युवराज भोसले, प्रफुल्ल जानराव,डाॅ.राजदत्त रासोलगीकर धनाजीधीमधीमे, प्राचार्य भास्कर बनसोडे यांच्या स्वाक्ष-या आहेत....
सोलापूर : कोरोना विरोधात जीव धोक्यात घालून लढणाऱ्या सोलापूरातील डॉक्टर, पोलीस, आरोग्य , स्वच्छता कर्मचारी तसेच विविध माध्यमातील पत्रकार या योद्ध्यांना त्यांच्या महत्वपूर्ण कार्यासाठी श्रीमंतयोगी...