बदलापुरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर आज एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच १ महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरीत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या.
