बार्शी – डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यासंघटनेच्या बार्शी तालुका सहकोषाध्यक्षपदी B 1 न्यूजचे संपादक भैरवनाथ चौधरी यांची नुकतिच निवड झाली . त्याबद्दल त्यांचे मित्र परिवार व संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पत्रकारांचे हित सोपासत पत्रकारांच्या विविध अडचणी सोडविणेसाठी कार्यरत आहे . भैरवनाथ चौधरी यांनी गुळपोळी ( ता बार्शी ) सारख्या ग्रामीण भागातून पत्रकारितेला सुरुवात केली . पुढे त्यांनी बार्शी शहर व तालुकास्तरावर काम करित आपल्या कामाचा ठसा उमटविला . त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे
.
भैरवनाथ चौधरी हे पत्रकारीते बरोबर महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मार्फत सामाजिक कार्य करीत असतात . बार्शी तालुका सहकोषाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे मित्र परिवार व संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.