hacklink hack forum hacklink film izle hacklink lunchtime resultsGrandpashabetjojobetgrandpashabethepbet girisjojobet girişjojobetjojobetgrandpashabet
महाराष्ट्र

अजित पवार अनगर चा नाद करायचा नाय,बाळराजे यांचे थेट आव्हान

https://www.facebook.com/share/r/17WzWNfGgz/पवार कुटुंबियांची दिलगिरी व्यक्त करून माफ करावं-राजन पाटील

सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ अनगर नगरपरिषदाची पहिल्यांदा हात असलेली निवडणूक राज्यभर गाजते आहे , कारण या अनगर ग्रामपंचायतीवर गेली ६८ वर्ष माजी आमदार राजन पाटील यांच्या कडे आहे , या ग्रामपंचायतीची नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर पाहिल्यान्दा निवडणूक होत असल्याने वर्चस्वादासाठी मोठा राजकीय नाट्य घडत या नगरपरिषदेच्या १७ च्या १७ जागा बिनविरोध झाल्या , झालेल्या बिनविरोध निवडणुकीवर दहशदीचे सावंत असल्याची दबकी चर्चा सर्वत्र होते आहे ,
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतच्या पहिल्यांदा निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व पणाला लागले होत पाटील यांनी भाजपा मध्ये नुकताच प्रवेश केला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगर पालिका आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी फक्त भाजपाच्या तिकिटावर आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवायचा निर्णय घेला. त्या प्रमाणे अनगर येथे १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.अनगर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण माहिलासाठी आरक्षित होते . त्या नुसार माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता .त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्वला थिटे तर अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला.अर्ज छाननीच्या दिवशी अपक्ष उमेदवार शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या थिटे यांच्या अर्जावर पाच आक्षेप घेतले.यात सूचकाची सही नाही, मतदार यादीतील प्रभाग क्रमाक चुकीचा,मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा,वयाचा पुरावा नाही, सूचकाचा नामनिर्देशन पत्रात चुकीचा क्रमांक असे ५ आक्षेप घेतले होते ,या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी ३ आक्षेप किरकोळ,तांत्रिक हरकती विचारात घेतल्या नाही. मात्र सूचकाची सही नाही .सही नसणे हि कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याने उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती मुळीक यांनी दिली आहे.अपक्ष उमेदवार यांचा अर्ज माघारी घेतला गेला जाणार आहे , त्यामुळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष बिनविरोध होणार असून याची औपचारिक घोषणा बाकी आहे, या अनगरच्या नगरपरिषदेच्या बिनविरोध झाल्याने जिल्ह्यात भाजपाने नगर पालिका आणि नगराध्यक्ष पदाचे खाते खोलले असल्याच बोललं जाताय ,

अनगरमध्ये अर्ज बाद, उज्वला थिटेंची न्यायालयात धाव घेणार – उज्वला थिटे

-पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार मला होता ,तिथं मला जाऊच दिले नव्हते,मात्र मी कसा संघर्ष करत तिथे गेले हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेल आहे.- माझ्या गाड्यांचा पाठलाग झाला,तिथे धक्काबुक्की करून हल्ला करायचा,ऍट्रॉसिटी दाखल करण्यासाठी तिथे महिला होत्या.रस्त्याने ट्रॅक्टर्स उभे केले आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या तपासल्या जातं होत्या आणि मी त्यात दिसते का हे पाहण्यासाठी हा प्रकार सुरु होता.
अर्ज भरल्या नंतर त्यांनी छाननीमध्ये तो बाद करणारच याची मनात खंत होती,आमचे सर्व कागदपत्र व्यवस्थित होते,त्यामुळे मनातील खंत पूर्ण झाली.
जो माणूस स्वतःच्या मुलांना 302 च्या कलमातून सोडून आणतो त्या माणसासाठी चार कागद गहाळ करायला किती वेळ लागतो.
या सर्व प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सूचक म्हणून सही झाली नसेल तर लक्षात आणून देण्याचं त्यांच काम होते आणि सूचक म्हणून माझा मुलगाच होता.माझ्या स्वतःच्या मुलाच्या जिवाला धोका असताना सुद्धा सूचक म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या मुलाला सूचक म्हणून घेऊन गेले.
कोणती आई स्वतःच्या मुलाचा चा जीव धोक्यात घालेल त्याला सही करण्यासाठी मी तिथे घेऊन गेले होते.
त्यामुळे त्याची सही राहिलेली असेल,माझा क्रमांक सुचलेला असेल आणि मी तिथे गेल्यानंतर मला मतदार यादी दिली त्याआगोदर मला मतदार यादी उपलब्ध करून दिली नाही. याविरोधात आता मी न्यायालयात दाद मागणार,दरम्यान या छाननीचा सविस्तर अहवाल द्या म्हणून आम्ही त्यांना कालच मेल केलेला आहे.मात्र त्यांच्याकडून तसा अहवाल अद्याप आलेला नाही.न्यायालयात येण्याची आम्हाला 3 वाजेपर्यंतची डेडलाईन आहे त्यामुळे आम्हाला अहवाल आलाच नाही तर आम्ही न्यायालयात पोहचयाचे कसे..? असा प्रश्न उज्वला थिटे यांनी उपस्थित केलाय ,

अनगर नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांची जोरदार टीका

माजी आमदार राजन पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची जहरी टीका केली , अनगरकर पाटलांचा हा पळपुटे पणा पुन्हा सिद्ध झाला
लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन पाठिंबा सिद्ध करण्याची संधी गमावली असल्याचं उद्देश पाटील याची सूचित केलं आहे . उज्वला थिटे यांच्यावर किती मोठा अन्याय झाला असल्याचहि त्यांनी सांगितलं आहे , किती ही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालं ,अर्ज छाननीत बाद करून तुम्हीच जिंकला असला तरी लोक मतात उज्वला थिटे जिंकल्या ,उज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत तर अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत अशी टीका
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केली

अजित पवार अनगरच नाद करायचं नाही -बाळराजे पाटील थेट अजित पवार याना आव्हान

अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला पहिल्यांदाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या आव्हानामुळे येथील बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला ब्रेक लागला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला धिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. बाळराजे पाटलांचा अजित पवारांना त्वेषाने आव्हान देतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सोलापूरच्या राजकारणात या व्हिडीओची बरीच चर्चा होत आहे.नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बाळराजे पाटील एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून जल्लोष करत होते. त्याचवेळी ते कॅमेऱ्याकडे बोट दाखवून अगदी त्वेषाने म्हणाले, “अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.” हे राज्यभरात लक्षवेधी ठरलाय

माजी आमदार राजन पाटील यांची उपरती , बाळराजे याना पार्थ आणि जय पवार समजून माफी असावी

माझ्या मुलाच्या तोंडून न कळत, भावनेत, उत्साहात जे अपशब्द गेलेत ते व्हायला नको होते. त्याबद्दल मी अजितदादा आणि पवार परिवाराचं अंतःकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो, मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझी विनंती हा विषय आता थांबवावा. अजितदादांनी पार्थ किंवा जयसारखं समजून बाळराजे पाटलांना पदरात घ्यावं.

Related posts