अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा पंचाक्षरी स्वामी यांची तर उपाध्यक्षपदी पंचप्पा धनशेट्टी आणि सचिवपदी बिसलसिध्द काळे,कार्याध्यक्षपदी अशोक सोनकंटले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापुरातील हाॅटेल सोनामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पत्रकार संजीव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांच्या चर्चेनंतर नूतन अध्यक्षपदाच्या निवडीची चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी पंचाक्षरी स्वामी यांचे नाव इंगळे यांनी सुचवले त्यांस अब्दुल रज्जाक बागवान यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपाध्यक्षपदी पंचप्पा धनशेट्टी आणि सचिवपदी बिसलसिध्द काळे,कार्याध्यक्षपदी अशोक सोनकंटले यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार दक्षिण सोलापूरचे आमदार मा श्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.नूतन कार्यकारणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष: पंचाक्षरी स्वामी
उपाध्यक्ष:-पंचप्पा धनशेट्टी,
सचिव:-बिसलसिध्द काळे,
कार्याध्यक्ष:-अशोक सोनकंटले,
खजिनदार:-आनंद बिराजदार
सहसचिव:-इरप्पा बोरीकरजगी
प्रमुख संघटक:-शिवदास वाडकर
सहसंघटक:-तुकाराम शेंडगे
प्रसिद्धीप्रमुख:धोंडप्पा रूपनुरे,महमद शेख
सदस्य:-अनिल कापसे,अमोल साळुंखे,संदीप येरवडे,गिरमल्ला गुरव,हसन नदाफ,शिवय्या स्वामी,नागेश कोळी,शिवराज मुगळे,महेश पवार,
सल्लागार:-मनिष केत,नारायण चव्हाण,संजीव इंगळे,अब्दुल रज्जाक बागवान,सुरेश वाघमोडे,इरण्णा गंचिनगोटे याप्रमाणे निवड करण्यात आले आहे.
