पंढरपूर

राज्य मुख्याध्यापक संघाचा जितेंद्र पवार यांना पाठिंबा. मुख्याध्यापक संघाची भूमिका ठरणार निर्णायक.

सचिन झाडे
पंढरपूर –

पंढरपूर येथे राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली पुणे शिक्षक मतदार संघातील निवडणुकी संदर्भात बैठक पार पडली. यावेळी राज्य मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, शिक्षक बांधव यांच्यात पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली.

बैठकीदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रा. सुभाष माने जो उमेदवार देतील त्या उमेदवारास सर्व संघटनेचे पदाधिकारी निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी दिली. भाजपा प्रणित उमेदार जितेंद्र पवार यांना मुख्याध्यापक संघाच्या वतीने प्रा. सुभाष माने यांनी पाठिंबा दर्शविण्यात आला.भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार यांना निवडून आणण्या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.

याप्रसंगी कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर येथील संघटनेचे पदाधिकारी व व प्रा. सुभाष माने यांना मानणारा मोठा शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Related posts