उस्मानाबाद  तुळजापूर

संग्राम प्रशांत अपराध यांचे एमबीबीएस अंतिम परिक्षेत घवघवीत यश ; परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – नगरीचे सुपुञ संग्राम प्रशांत अपराध यांनी एमबीबीएस अंतिम परिक्षेत सदुसष्ट टक्के गुण घेऊन प्रथम श्रेणी उत्तीर्ण होवुन घवघवीत यश संपादन केले .

डॉ. संग्राम यांचे प्राथमिक शिक्षण शांतीसागर शाळेत माध्यमिक शिक्षण केशवराज विधालय लातूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण राजश्री शाहु महाविद्यालय लातूर येथे झाले त्यांनी एम बी बी एस पदवी अश्विनी ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविधालय सोलापूर येथे पुर्ण केली. डॉ. संग्रामच्या यशा बद्दल विविध राजकीय सामाजिक संघटनांनी त्याचा या यशा बद्दल कौतुक करुन सत्कार केला.

डॉ. संग्राम यांचे वडील प्रशांत एसबीआय बँकेत असुन चुलते भारत अपराध हे जिल्हा न्यायालयात असुन अपराध कुंटुंबिय श्रीतुळजाभवानी मातेचे पुजारी आहेत.

Related posts