Blog

संकल्प करा जगण्याचा ; आपल्या सोबत दुसऱ्याला वाचवन्याचा—

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद।

=====================================================================================================

आजचा काळ खूप नाजूक व तणावपूर्ण होऊन बसला आहे आणि याला कारण म्हणजे आपण स्वतः आहोत या कोरोणा काळातील आपले वागणे ,बोलणे, भाषा ,आपले अर्धवट ज्ञान ,आपले नकारात्मक विचार ,आपला अहंकार ,आपले मोठेपण याला जबाबदार आहे. सरकारने घालून दिलेले नियम पाळणे नाही, मास्क लावणे नाही, सॅनिटायझर वापरणे नाही, हात धुणे नाही ,गर्दीत मुद्दाम जाणे, विनाकारण गर्दी करणे ,जणु काही कोरोणा तुमचा खुप ओळखिचा आहे आणि तुम्हाला सोड़नार आहे! सरकार आपले मायबाप आहे आपली किती काळजी घेत आहे याचे आपल्याला भान ही नाही!

आपण आपल्याच तोऱ्यात वावरत आहोत फिरत आहोत हे सगळं आपण चुकीचं करत आहोत असं नाही का वाटत? आपल्याला आपल्या जीवनापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही अशा भयंकर काळात स्वतः सरकार, पोलीस, डॉक्टर, शिक्षक, आशा कार्यकर्ता ,स्वच्छता कर्मचारी व सर्व इतर कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी जागा उरलेली नाही , ऑक्सिजन पुरवठा होत नाही एवढी माहिती आपल्याला मिळत असताना अजून आपण गाफील राहत आहोत हे म्हणजे आपण स्वतःला व आपल्या कुटुंबाला फसवत आहोत आपण स्वतःसाठी नव्हे तर आपल्या लेकरा बाळासाठी जगले पाहिजे त्यांच्या भविष्यासाठी जगले पाहिजे थोडे दिवस त्रास सहन करा, हेही दिवस जातील हे दिवसअसेच जाण्यासाठीच आलेले आहेत फक्त शांततेनं संयमाने व धाडसी पणाने वागा.

रहा एकमेकांना धीर द्या, मदत करा ,किमान फोनवर बोलताना सकारात्मक बोला माहिती द्या घाबरू नका अफवा पसरवू नका !त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करा लसीचे महत्त्व सांगा लस घेण्याबद्दल जनजागृती करा हे सगळे प्रयत्न आपणास सर्वांसाठीच आहेत हे सर्वजण देव बनून आपल्या सेवेत कार्य करीत आहेत पुन्हा आपल्याला वाचवायला देव येणार नाही तो प्रत्येकाच्या रूपाने सरकारच्या मुखातून, आपल्याला जगण्याचा मार्ग सांगत आहे म्हणून आपण संकल्प करा जगण्याचा व दुसऱ्याला वाचवण्याचा आपल्या योग्य मार्गदर्शनामुळे कित्येकांचे प्राण वाचणार आहेत दुर्दैवाने काही घटना विचित्र घडत आहेत परवा नाशिक मधील घटना असो ,भंडाऱ्यातील घटना असो किंवा आजचे विरारमधील घटना असो विरार मधील अग्नितांडव महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना घडली !किती दुर्दैव आहे

देशात दररोज लाखोंच्या संख्येने कोरोना पेशंट वाढत आहेत, कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आपण स्वतः आपल्या मृत्यूला कारणीभूत होऊ नये! यासारखे दुसरे दुर्दैव नाही समजदार, सुजान व्यक्ती ,समाज जर असं बेजबाबदार वागत असेल तर मग त्याला काहीच पर्याय राहणार नाही डॉक्टर सांगताहेत सरकार सर्वांना विनंती करीत आहे, तज्ञ सांगत आहेत वेगवेगळ्या सामाजिक संस्था सांगत आहेत, आपण आपले स्वतःचे आरोग्य सांभाळा मला काही होत नाही असं म्हणून दुसऱ्याचा जीव संकटात टाकू नका! मित्रांनो आपणास सर्वांनाच एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे आम्ही मरणार नाही मला काहीच होणार नाही अशा अविर्भावात कोणीही राहू नये!

कारण आत्तापर्यंत संतानी आपल्याला बराच अनुभव दिलेला आहे आतापर्यंत करोडो जीव जन्माला आले आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे हा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे तो कुणालाही सोड़नार। नाही”काळाचिये उड़ी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप !!म्हणून आपण स्वतः संकल्प करा जगण्याचा व दुसऱ्याला जगवण्याचा आज कोरोना आहे पण उद्या भविष्यात आणखी काहीतरी विचित्र आजार येणार आहे अशा आपल्या वागण्याने आपल्या भावी पिढीचे खूप नुकसान होईल आपण भावी पिढीला काय संदेश देणार आहोत? आपण आपलीच लेकर, बाळ यांना यांना काय शिकवण अनुभव देणार ?आपल्यामुळे या नवीन पिढीचे नुकसान होऊ नये याची सर्वांनी काळजी व खबरदारी घेतली पाहिजे

आपली सुरक्षितता ्म्हणजेच दुसर्‍याची सुरक्षितता होय. आज सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू आहे आता सांगायची किंवा चर्चा करीत बसायची वेळ नाही आता आपण कसं जगावं ,आपले कुटुंब कसे सांभाळावे ही सामान्य जनतेपुढे मोठे आव्हान होऊन बसले आहे अशा वेळी एकमेकांना धाडस देऊन मानसिक सुदृढता निर्माण केली पाहिजे मानसिक आरोग्य सांभाळले पाहिजे सध्यातरी फक्त आणि फक्त सकारात्मक विचार सकारात्मक चर्चा सकारात्मक शक्ती निर्माण करणे गरजेचे आहे पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वीचा मृत्यूचा प्रकार ही वेगळा होता पण आज मृत्यू नेच भयंकर उग्र रूप धारण केलेले आहे अकस्मात मृत्यू! मरण सोपे झाले हो म्हणण्याची वेळ आली आहे आता हे आपल्याला पक्कं लक्षात ठेवायला हवं की कोरणा आपली लवकर पाठ सोडणार नाही म्हणून आपल्याला आपले आत्मबल, आरोग्य सुदृढ मजबूत बनवायला हवे,

शारीरिक व्यायाम योगा तसेच मानसिकता भक्कम बनवायला हवे मास्क सॅनिटायझर वापरणे गर्दी न करणे, गर्दी टाळणे हीच या कोरोना वरील शस्त्र आहेत या काळात हीच आपली ढाल तलवार आहेत त्याबरोबरच नियमांचे पालन करून घरीच राहणे हे सर्वांसाठी सुरक्षित आहे घरीच राहणे म्हणजेच हे कोरोनाचे युद्ध जिंकण्यासारखे आहे जो या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करील, तोच येणारा सुंदर भविष्यकाळ बघेल हेच सूत्र होऊन बसले आहे आनंदी राहा, आनंदी जगा, स्वतःचं जगणं त्याच बरोबर दुसऱ्याचं जगणही आनंदी करा या लोक डाऊन च्या काळात विविध कलागुणांना वाव द्या आपल्या मध्ये भरपूर कलागुण सुप्त रूपाने आहेत त्याला जागृत करा वेगवेगळ्या कलांमध्ये वेळ घालवा, घरात प्रसन्न व आनंदी वातावरण ठेवा तरच आपण येणाऱ्या अशा भयंकर वादळात टिकणार आ होत घरीच रहा ,सुरक्षित रहा येणारा सुंदर भविष्यकाळ पहा!
धन्यवाद।🙏🏻🙏🏻

Related posts