भारत

मुस्लिमांनी ‘इस्लाम खतरे में है’ या भितीचक्रात फसू नये : मोहन भागवत

सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे आणि मुस्लिमांनी इस्लाम खतरे में है’ या भितीच्या चक्रात फसू नये”, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी एका कार्यक्रमात व्यक्त केले.
राष्ट्रीय मुस्लिम मंचद्वारे आयोजित केलेल्या ‘हिंदुस्तानी प्रथम, हिंदुस्तान प्रथम’ या कार्यक्रमात बोलत होते. भागवत पुढे म्हणाले की, “पुजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांच्यामध्ये विभाजन करू शकत नाही.”लिंचिंग प्रकरणांवर टिका करताना ते म्हणाले की, “ते लोक हिंदुत्वाच्या विरुद्ध आहेत”, हे सांगताना भागतांनी लिचिंगच्या खोट्या तक्रारीदेखील दाखल केल्या जातात, हेदेखील त्यांनी अधोरेखित केले.
“इस्लाम खतरे में है, या भितीच्या चक्रात लोकांनी फसता कामा नये. एकतेशिवाय विकास शक्य नाही. पण, त्या एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पुर्वजांचा गौरव असायला हवा. हिंदु-मुस्लिम संघर्षाचा शेवट हा संवाद आहे. विसंवाद नाही”, असंही त्यांनी अधोरेखित केले.
“हिंदु-मुस्लिम एकतेची बाब भ्रामक आहे. कारण, ते वेगळे नाहीतच. उलट एक आहेत ते. सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. भले ते कोणत्याही धर्माचे असोत. आपण सर्व एकाच लोकशाहीमध्ये आहोत. इथं हिंदू किंवा मुस्लिमांंचं प्रभुत्व असू शकत नाही. इथं फक्त भारतीयांचा प्रभुत्व असू शकते”, असे मत आरएसएसचे प्रमुख मोहन भागवतांनी मांडलं आहे.

Related posts