भारत

नेत्याच्या घरात सापडले ईव्हीएम

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून हावडा येथील उलूबेरिया नॉर्थमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी ईव्हिएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशिन सापडली आहे. ही माहिती समजताच एकच खळबळ उडली असून पसिरतरात तणाव आहे. उलूबेरिया उत्तरमधून असलेले भाजपचे उमेदवार चिरेन बेरा यांनी आरोप केला की तुलसीबेरियाचे टीएमसी नेता गौतम घोष यांना ईव्हीएम आणि ४ व्हीव्हीपॅटसह पकडलं.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात ही ईव्हीएम मशीन अतिरिक्त आरक्षित मशिनपैकी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून याप्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. ही बाब समोर आल्यानंतर परिसरात मोठा जमाव जमला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला.

Related posts