मोहोळ

घाणीमुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून डुकरांचा सुळसुळाट झाला आहे

मोहोळ शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाखाली येणारे गटाराचे घाण पाणी पुलाच्या परिसरात पसरत आहे.त्यामुळे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.घाणीमुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून डुकरांचा सुळसुळाट झाला आहे तसेच सर्वीस रोडवर हाॅटेल लोकसेवा या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी साचून रहाते त्यामुळे दोन चाकी व चार चाकी वाहनांतून जाताना अत्यंत त्रासदायक होत आहे.
तसेच कन्या प्रशाला चौकातील भुयारी मार्गासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली असून त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.


त्याचप्रमाणे कादे पेट्रोल पंप व वैराग-बार्शी वळण रस्त्यावर हाॅटेल स्वराज्य समोर गतिरोधक करणे अत्यंत आवश्यक आहे.कादे पेट्रोल पंपाचे ठिकाण हे वर्दळीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी अपघात होत असतात. तर हाय-वे वरून वैराग-बार्शी रस्त्याकडे वळणे अतिशय धोकादायक आहे.सोलापूरहून पुण्याकडे जाताना वाहणे अतिशय वेगात येतात त्यामुळे वैराग-बार्शीकडे वळताना याच ठिकाणी आत्तापर्यंत गंभीर अपघात होऊन आठ ते दहा जण मरण पावले आहेत तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. म्हणून जिवितहानी टाळण्यासाठी दोन्ही ठिकाणी वाहणांचा वेग कमी करण्यासाठी योग्य आकाराचे गतिरोधक करण्यात यावेत.
अशा प्रकारच्या मागण्या टोल प्रशासनाकडे करण्यात आल्या.

Related posts