23.5 C
Solapur
September 10, 2024
महाराष्ट्र

भारतातील कोरोना परिस्थिती गंभीर : WHO

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. भारतात आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. आरोग्य सुविधांच्या मदतीसाठी अनेक देशांनी मदतीचा हात दिला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. तर दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील कोरोना स्थितीवर भाष्य केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे, भारतामधील परिस्थिती गंभीर आहे या काळात मदत केली जात आहे. यासंदर्भात एएफपीने वृत्त दिलं आहे
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे की, ‘जागतिक आरोग्य संघटना जे शक्य आहे ते सर्व करत आहेत. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे. आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी २६०० तज्ज्ञ भारतात पाठवण्यात आले आहेत. गेल्या पाच महिन्यात जितके कोरोनाचे रुग्ण आढळले होते, तितक्या रुग्णांची गेल्या एका आठवड्यात नोंद झाली आहे. कोरोनाची इतकी गंभीर स्थिती आहे की, ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन याची कमतरता जाणवू लागली आहे. नातेवाईक यासाठी पळापळ करताना दिसत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे.

Related posts