करमाळा

जेऊर मंडलाधिकारी कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी उमेश पवळजेऊर मंडलाधिकारी कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष धीरज राजे निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

यावेळी धीरज निंबाळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये असे सांगितले की सध्याच्या काळातील तरुण हा व्यसन मुक्त झाला पाहिजे स्त्री महिलांचा सन्मान केला पाहिजे कुठल्याही मुली वर अन्याय झाला तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी त्या महिलेच्या किंवा स्त्रियांच्या मनामध्ये रुजली पाहिजे व सर्व महिला सशक्त नारी बनली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश जगताप व मोहशीन हेडे उपस्थित होते

Related posts