उस्मानाबाद  सोलापूर शहर

मागासवर्गीय मुख्याध्यापक मारहाण करणाऱ्या शिक्षकांना अटक करून कारवाई करा

सोलापूर दि.- मत्स्योदरी विद्यालय हस्तेपोखरी,तालुका अंबड येथील मागासवर्गीय मुख्याध्यापक भाऊ सुज्ञान निर्मळ यांना त्यांच्याच शाळेतील सहा जातीयवादी शिक्षकांनी शाळेच्या कार्यालयात बेदम मारहाण केली आहे.या जातीयवाद्यांना त्वरित अटक करून कारवाई करा नाही तर याप्रश्नी राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात येतील असा इशारा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड तसेच गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना ऑनलाईन निवेदन पाठवून दिला आहे.
राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक करीत होते.सर्व शिक्षकांनी मिळून कार्यक्रम कसा करायचा हे सांगत असताना ‘ तू फार शहाणा आहेस का,आम्हाला सगळं कळतंय’ असा दम देऊन शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापक निर्मळ यांना शाळेच्या कार्यालयात बेदम मारहाण केली आहे.विशेष म्हणजे ही संस्था आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची आहे.


पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी ॲक्ट )नुसार गुन्हा दाखल केला आहे.परंतु गुन्हेगारांना अद्याप अटक केलेली नाही.ही बाब अतिशय गंभीर आहे.गुन्हेगारांना त्वरित अटक होऊन कारवाई न झाल्यास जातिवाद्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी पदाधिकारी यांच्या विरोधात राज्यभर मोर्चे काढण्यात येतील.होणाऱ्या परिणामास अन्यायकर्ते सर्वजण जबाबदार राहतील.शासनाने दिलेल्या निवेदनावर राज्याध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर,उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे,राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड,जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर,दिव्यांग विभाग प्रमुख विजय कुमार लोंढे,प्राध्यापक डॉ.राजदत्त रासोलगीकर,संग्राम कांबळे,दाऊत आतार,युवराज भोसले,प्रफुल्ल जानराव,बलभीम हांडे यांच्या सह्या आहेत.

Related posts