उस्मानाबाद 

जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यास वाढीव निधी मंजूर

सन 2021-22 (सर्वसाधारण) मधून उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यास 120 कोटीची वाढीव निधी मंजूर करून एकूण सन 2021-22 करीत नियतव्यय 280.00 कोटी निधी मंजूर

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

धाराशिव (उस्मानाबाद) – जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा सन 2021-22 (सर्वसाधारण) मधून उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यास 120 कोटीची वाढीव निधी मंजूर करून एकूण सन 2021-22 करीत नियतव्यय 280.00 कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी यांनी दिली.

आज विभागीय आयुक्त कार्यालय, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री मा.ना.अजित (दादा) पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

बैठकीवेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MREGS) अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने एक काम मंजुर करावे. तसेच रोजगार हमी योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी मा.उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली. याबाबत त्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेस दिल्या.

यावेळी मृद तथा जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना.शंकरराव गडाख-पाटील, स्वच्छता-पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे, खा. ओमराजे निंबाळकर, जि.प.अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे, आ.विक्रम काळे, आ.कैलास घाडगे-पाटील, आ. ज्ञानराज चौगुले तसेच अन्य लोकप्रतिनिधी, वरिष्ठ स्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Related posts