महाराष्ट्र

माध्यमिक शिक्षकांसाठी कॅशलेस योजना सुरु करा

शिक्षक प्रतिनिधी सातलिंग शटगार यांची शिक्षण मंत्र्याकडे मागणी………… महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची आज मुंबई येथील त्यांच्या निवास स्थानी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षकाचे प्रतिनिधी श्री सातलिंग शटगार यांनी भेट घेऊन महाराष्ट्र शासनाने शिक्षकांसाठी कॅशलेस योजना सुरु करावे अशी मागणी केली त्या बरोबर प्रचलित अनुदान.. टप्पा… आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासबंधिचे निवेदन देण्यात आले…… महत्वाचे म्हणजे शिक्षक कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक आजारी पडल्यानंतरचे बिल लवकर मिळत नसून त्यासाठी अनेक हेलपाठे वर्षानुवर्षे शिक्षण कार्यालयास मारावे लागतात…..त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी कॅशलेस योजना सुरु झाल्यास आजारी व्यक्तीस योग्यावेळी उपचार मिळेल यासाठी कॅशलेस योजना लवकर सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे

Related posts