करमाळा

संजयमामा हे आपल्या तालुक्यासाठी धाडसी आमदार मिळाले आहेत:-जगताप

करमाळा/प्रतिनिधी(उमेश पवळ )
करमाळा तालुक्याचे आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या ३१ जुलै रोजी ५३ व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात पाच हजार पाचशे त्रेपन्न झाडे लावण्याच्या सुरूवातीच्या कार्यक्रमाप्रसंगी हा संकल्प खुप कौतुकास्पद आहे.आमदार संजयमामा हे आपल्या तालुक्यासाठी एक धाडशी आमदार मिळाले आहेत.रात्रदिवस ते तालुक्यासाठी काम करतायत तसेच काम कार्यकतेँ हि तालुक्यात करतात याचा मला पुरेपुर आनंद होत आहे असेच सामाजिक कामे करा असे तालुक्याचे युवक नेते मा.शंभुराजे जगताप बोलताना म्हणाले.
यावेळी माढा पं.स.सदस्य मा.धनराज शिंदे,यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश करे-पाटील,मार्केट कमिटीचे संचालक मा.चंद्रकांत सरडे,आदिनाथ चे मा.संचालक मा.तानाजी झोळ,बोरगाव चे सरपंच विनय ननवरे यांच्या हस्तेवृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी ता.वैदयकीय अधिकारी डॉ.मा.राहुल कोळेकर,मा.सभापती चंद्रहास निमगिरे,माजी पं.स.सदस्य मा.विलास पाटील पाडळीचे सरपंच मा.गौतम ढाणे,गुळसडीचे मा.सरपंच मानसिंग खंडागळे,बोरगाव वि.वि.सो.चेअरमन विष्णू मस्के,राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे ता.अध्यक्ष सर्वेश देवकर-पाटील,करंजेचे उपसरपंच शरद पवार ग्रा.पं.सदस्य संजय शिंदे सामाजिक कार्यकर्ते ननवरे भाऊ सह बोरगाव ग्रामस्थ,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व आमदार संजयमामा शिंदे गटाचे काही गावातील प्रमुख कार्यकर्ते व करमाळा पत्रकार संघाचे पत्रकार जयंत दळवी,पत्रकार विशाल घोलप उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आयोजक युवा नेते आशपाक जमादार,परमेश्वर भोगल,दिपक भोज, संदीप घाडगे,संदीप ननवरे, श्रीराम भोगल,निलेश पाटील, सचिन गायकवाड,राहुल चोरमले,शितल देशमुखे,विशाल कुभांर,अभिजित सुर्यवंशी, गणेश वाडेकर, तुषार शिंदे,गणेश वाळुंजकर,राजेंद्र पवार,विक्रम कुभांर, संजय सरडे,महेश पाटील,आयुब शेख,पप्पू पठाण,समीर शेख,अशिष फकीर,जयसिंग सिंगन,स्वपनिल गांधले,अभिजित चव्हाण,विकास गायकवाड आदि विशेष परीश्रम घेत आहेत.

Related posts