Blog

दुख पुस्तकांचं

————///—

आमचं दुःख कळणार नाही कुणा ,म्हणतात फक्त वाचणार तुम्हा आवडीने वाचणारे आम्हाला बघतात, नाहीतर दुसरे टरकन फ़ाडतात ! कोणी पाहतो वरचा पुठ्ठा, कोणी पाहतो खालचा पुठ्ठा, कोणी पाहतो प्रस्तावना तर कुणी चित्रांगणा! आम्हाला कोंबतात पिशवीत, पलंगावर किंवा खुर्चीत असतील पाने कमी फार तरच वाचतात जीवापाड! मध्येच असेल चित्रांची गंमत मगच येते त्यांना रंगत वाचता वाचता आम्हाला साखर झोप येते तुम्हाला! पाहुनी तुमचा हा वेश आम्हाला होतो खूपच द्वेष, वाचुनी आम्हाला झाले विद्वान ज्ञानी तरीही आमची करतात हेटाळणी!

कवि:-
श्री देविदास पांचाळ सर,
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts