महाराष्ट्र

कृषि महाविद्यालय, आळणी येथे गांडूळखत प्रकल्पाचे उद्घाटन.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित, कृषि महाविद्यालय, आळणी (गडपाटी) उस्मानाबाद येथे गांडूळखत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे जय भवानी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. जयसिंग पंडित तसेच धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

जय भवानी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. जयसिंग पंडित तसेच धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सर्व प्राध्यापक व मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित, कृषि महाविद्यालय, आळणी (गडपाटी) उस्मानाबाद येथे आठव्या सत्रांतर्गत महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, अनुभवातून प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत गांडूळखत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीपासून बचत करण्यासाठी तसेच जमिनीचे (मातीचे) आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी गांडूळखत हा एक उत्तम पर्याय असून शेतकऱ्यांसाठी तो एक उत्तम जोडधंदा होऊ शकतो.

उपस्थिती मान्यवरांना व विद्यार्थ्यांना गांडूळखत विषयी माहिती सांगताना प्रकल्प संचालक प्रा. गार्डी सर.

गांडूळ खत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल घडविला जातो. गांडुळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाणही कमी होते. जमिनीचा सामू अर्थात पी.एच. योग्य पातळीत राखला जातो. गांडूळ खालच्या थरातील माती वरती आणतात आणि तिला उत्तम प्रतीची बनवतात. खतामध्ये मसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीड व रोग प्रतिकारक्षमता वाढते. पिकांची वाढ झपाट्याने होते. विषविरहित दर्जेदार शेतीमाल तयार होतो. जमीन पडीक होण्याचे प्रमाण घटते.जमिनीची उत्पादन शक्ती वाढते, जमीन सुधारते. अशी माहिती यावेळी विभागप्रमुख प्रा. सुतार एन. एस. यांनी दिली. एका बेडमधून वर्षाला चार टन गांडूळ खताचे उत्पादन मिळते, असेही त्यांनी सांगितले. अत्यंत कमी जागेत मोठ्या प्रमाणावर गांडूळ खताचे उत्पादन घेता येत असल्यामुळे त्यातून चांगला नफा मिळतो. शिवाय गुरांचे शेण, टाकाऊ वस्तू या प्रकल्पामध्ये टाकून त्यापासून गांडूळ खताची निर्मिती करता येते.या खताला चांगली मागणी असल्यामुळे बेरोजगार तरुणांसमोर रोजगाराची एक नवी संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. असे देखील ही प्रा. सुतार सर यावेळी म्हणाले.

उपस्थित मान्यवरांनी प्रात्यक्षिक करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाअंतर्गत मोठ्या प्रमाणात गांडूळखत चे उत्पादन व्यवस्थापन करण्याचा मानस प्रकल्प संचालक प्रा. गार्डी सर यांनी व्यक्त केला. गांडूळखत शेतकऱ्यांना तसेच जमिनीला तर फायदेशीर आहेच त्याच बरोबर, विशेष म्हणजे बेरोजगारांना नवा रोजगार देण्याकरता हा प्रकल्प रोल मॉडेल ठरेल असा विश्वास विषय प्राध्यापक श्री. गार्डी सर यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रकल्प यशस्वी होण्यासाठी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील के. एच., प्रकल्प संचालक प्रा. गार्डी सर, प्रा. सुतार एन. एस., प्रा. दळवे एस., प्रा. बुरगुटे के. ए., प्रा. पाटील एस. एन., प्रा. शेटे डी. एस., प्रा. बंडे के. डी., प्रा. साबळे एस. प्रा. वाकळे मॅडम, एन., प्रा. जगधने एस. एम., प्रा. गुरव पी. के., प्रा. नागरगोजे सर, प्रा. भालेकर सर, प्रा. पठाण मॅडम, प्रा. गायकवाड सर, प्रा. खताळ सर, प्रा. साठे सर, महाविद्यालय व्यवस्थापक प्रा. घाडगे एच. एस. यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

Related posts