पंढरपूर

आ दत्तात्रय सावंत हे चळवळीतील नेतृत्व – भीमा व्यवहारे

पंढरपूर –

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ३५उमेदवार उभा राहिले असले तरी त्यामध्ये स्वतः अकरा वर्षे विना अनुदानित शाळेवर काम केलेले संघर्ष करून चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व म्हणून दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या कडे पाहिले जाते, शिक्षक मतदार संघात यापूर्वी शिक्षक संघटनांचे उमेदवार उभा असायचे परंतु यावेळी राजकीय पक्षांसह संस्थाचालक व उद्योगपती उभा राहिले आहेत, त्यांच्याकडून आर्थिक आमिष दाखवून व दबाव टाकून मते मागितली जात आहेत.

दत्तात्रय सावंत यांनी २०१४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. त्यांनी विजयानंतर कार्याचा झंझावात पुढे कायम ठेवला होता, मतदार संघातील प्रत्येक शाळेला आमदार निधीतून शालेय साहित्य वाटप केले, महापुरग्रस्त शाळेला तेथील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य राज्य शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात आले होते.

विना वेतन दहा ते वीस वर्षे नोकरी करत विद्यादानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांवर राज्यकर्त्यांनी सातत्याने अन्याय केला आहे, शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळीतील व्यक्ती असलेले दत्तात्रय सावंत यांनाच विजयी करून सामान्य शिक्षकांचे नेतृत्व करण्याची संधी शिक्षक मतदार करतील असा विश्वास राज्य शाळा कृती समितीचे प्रसिद्धी प्रमुख भीमा व्यवहारे यांनी व्यक्त केला.

दत्तात्रय सावंत यांनी केलेल्या कार्यावर शिक्षक त्यांच्या कडे आकर्षित होत असून संघटनेमध्ये सहभागी होत आहेत. राज्यभरात जवळपास ५० हजारापेक्षा जास्त शिक्षक आ दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेत काम करतात. त्यांनी शिक्षकांना जुनी पेंशन योजना मिळावी यासाठी सातत्याने आंदोलने करीत शासनाकडे पाठपुरावा केला, विना अनुदानित तुकड्यांवरील
६०हजार शिक्षकांना पूर्ण वेतन मिळवून दिले.

खास करुन कायम विना अनुदानित शाळांचा कायम शब्द काढून त्यांना अनुदान सुरू केले त्यांना प्रचलित नियमानुसार पूर्ण वेतन मिळवून देण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत आहेत. केवळ आमदार होणे हे त्यांचे लक्ष नसून आमदार झाल्यानंतर मिळणाऱ्या अधिकाराचा वापर करून सामान्य शिक्षकांना न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य म्हणून जबाबदारी दत्तात्रय सावंत यांनी सक्षमपणे पार पाडली आहे, त्यामुळे तेच पुन्हा विजयी होतील.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ७० हजार शिक्षकांनी मतदानासाठी नोंदणी केली असून ३६७ केंद्रावर मतदान मंगळवारी दि१ डिसेंबर रोजी सकाळी ८ते५ या वेळी होणार आहे. होणाऱ्या मतदानापैकी ३५ हजार पहिल्या पसंतीची मते घेत दत्तात्रय सावंत हेच पुन्हा विजयी होतील, असा विश्वास आम्हाला असल्याचे भीमा व्यवहारे यांनी सांगितले.

Related posts