तुळजापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नुतन धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांचा सत्कार तुळजापूर तालुका शिवसेना च्या वतीने राजे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे करण्यात आला.
मा. नंदुभैय्याच्या नियुक्ती मुळे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटना बांधणीला बळ येणार असून सर्व निष्ठावंत व कट्टर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे मत यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी व्यक्त केले. नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख नंदुराजे निंबाळकर यांना अभिनंदन करून शुभेच्छा देत, मा. नंदुभैय्याच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये शिवसेना आणखी जोमाने वाढवणार असा ठाम निर्धार यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने केला.
यावेळी तुळजापूर शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, मा. उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, ग्रा. पं. सदस्य बाळू सिरसट, शिवसैनिक समाधान ढवळे आदी उपस्थित होते.