✍️✍️✍️ ग्रामपंचायतीच्या निवडणूका येत आहेत. सरपंच असाच पाहिजे जो…,
१. गावात CCTV लावणार;
२. प्रत्येक शेताला रस्ता बनवून देणार;
३. प्रत्येक शासकीय योजनेची माहिती दवंडी पिटवून सांगणार;
४. गावातल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी दर महिन्याला कृषि अधिकारी, कृषि सहायक बोलावणार;
५. जो गावातली मराठी माध्यमाची शाळा आदर्श बनवणार;
६. पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षा व खेळाडूंसाठी मदत करणार;
७. गरिबांना मोफत उपचार मिळावे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रावर लक्ष ठेवणार;
८. गरजूनांच घर देणार, पैसे खाऊन नाही.
९. महिला सक्षमीकरण; महिलांसाठी सुरक्षा पुरवणार, रोजगार पुरवणार;
१०. ग्रामपंचायतीचा सर्व हिशोब दर महिन्याला वर्षाला फळ्यावर लिहिणार, बॅनर लावणार.
११. जो गावातील वाद गावातच मिटवणार, शेत शिवाराचे वाद लवकरात लवकर मिटवणार.
१२. जो तलाठ्याला एकही रूपयाचा भ्रष्टाचार करू देणार नाही.
सरपंच तोच होणार, जो पैसे खाणार नाही, जात, धर्म पाहणार नाही..
लोकसेवा हाच धर्म…!