राज्यात संचारबंदी असतानादेखील कोरोनाचा प्रादुर्भावाचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्यभरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे. तत्पुर्वी काही मंत्र्यांनी लॉकडाऊनसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या सध्याच्या निर्बंधांवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी, मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचे आणि काही नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले होते.
तसेच, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना राज्यात ब्रेक दि चेनसाठी लॉकडाऊन महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागला पाहिजे असे मतही दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केले. त्यामुळे, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मंत्र्यांसह कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. ओक यांनीदेखील लॉकडाऊनसाठी आग्रह केला आहे. लसीकराणासाठी तरूणांनी पुढे यावे. नागरिकांनी नियमांच पालन करणं गरजेचे आहे. सध्याच्या निर्बंधांबाबत समाधानी नाही, असेदेखील ओक यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.
next post
