अशोक सोनकंटले
प्रतिनिधी दक्षिण सोलापूर
मंद्रुप पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांनी आपल्या
हद्दीतील गावात कायदा व सुव्यवस्थेबरोबर अवैध धंद्यांना पायबंद घातले. तक्रार घेऊन आलेल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देत यशस्वीपणे एक वर्षाची कारकीर्द पूर्ण केली. त्याबद्दल बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण सर यांच्या हस्ते साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे व पीएसआय गणेश पिंगूवाले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सचिन फडतरे, शहराध्यक्ष कीर्तीपाल घोडकुंबे, सोलापूर शहर सचिव सचिन पवार, मंद्रूपचे सोपान भडकुंबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजू चव्हाण यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करून अनेकांवर गुन्हे दाखल केले. पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आत्मीयतेने चौकशी करून त्यांचे प्रश्न अडचणी सोडविण्याची काम थेटे करीत असतात. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्या कार्याचा ठसा उमटला आहे. म्हणून आम्ही त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी सत्कार करीत आहोत असे यावेळी बोलताना सांगितले.
