30.2 C
Solapur
September 11, 2026
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य हादरे

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन; महाराष्ट्रात काही भागात भुकंपाचे धक्के बसले. राज्यातील कोल्हापूर, सातारा भागात सकाळी ९ च्या सुमारास हे धक्के जाणवले. ३.३ इतकी रिश्टर स्केल या भूकंपाची नोंद करण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याकडून हे वृत्त देण्यात आले आहे.

अधिक वाचा : कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल

यासोबतच हे धक्के सातारा परिसरात जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

रविवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने पाटण तालुका हादरला. तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी जाणवलेला ३ रिश्टर स्केलचा हा भूकंप सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी झाला.

हा भूकंप कोयना धरण परिसरात जाणवला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. या भूकपांत पाटण तालुक्यात कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हा भूकंप पाटण शहर व परिसरात जाणवला.

Related posts