लेखक
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद
=================================================================================
कोरोना वर्षातील घेतलेला आढावा . . .
2020 हे वर्ष कोरोना महामारी चे वर्ष म्हणून ऐतिहासिक वर्ष म्हणून मानावे लागेल या वर्षाने आपल्याला काय दिले आपल्याला काय अनुभव मिळाले आपल्याला काय काय शिकायला मिळाले कोरोना महामारी वर्ष थोडक्यात घेतलेला एक दृष्टिक्षेप बघता बघता हे वर्ष कसं संपलं ते कळलं सुद्धा नाही केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जहर रूपी विळखा घालून जगाचा संपूर्ण व्यवहार ठप्प करणारी ही कोरोना महामारी वर्षानुवर्ष स्मरणात राहणारी आहे हे वर्ष ऐतिहासिक महामारी चे आहे रस्त्या रस्त्यांनी चालणारी मुले बायका पुरुष मिळेल ते खाऊन मिळेल त्या रस्त्याने जिवाचा आकांत करीत स्वतःला वाचवण्यासाठी पळत होती, धडपडत होती, शाळा बंद, मंदिर बंद, व्यवहार सगळे बंद, नातीगोती विसरून स्वतःचा जीव कसा वाचवता येईल याचाच प्रत्येकजण विचार करत होता सण समारंभ, उत्सव, लग्न समारंभ ,सगळे काही बंद होते जिवावर बेतणारा कोणताही प्रसंग माणसाला नकोसा होता माणूस माणसापासून दूर पळत होता आजारी माणूस त्याचा परिवार माणसं शोधत होती माणसं जवळ करायचा प्रयत्न करीत होती
परंतु ही भयंकर महामारी माणसं तोडायचा प्रयत्न करीत होती माणसं दूर करायचा प्रयत्न करीत होती नोकरी गेली, धंदे बुडाले, व्यवसाय बंद पडले ,कोणी कोणाला ओळखायला तयार नाही माणसांच्या नातलगाच्या गाठीभेटी नाही माणसाचा माणसावरच संशय असा कसा वाढला असेल मृत्यूला न घाबरणारा माणूस माणसाला पाहून दूर दूर पळत असताना चे विदारक दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहतो, हृदयाची गती थांबते, काळजी व चिंतेने झोप उडून गेली, काय करावे ते कळेना कधी बंद तर कधी चालू माझ्या स्मरणातील कोरोना चा इतिहास जेवढं लिहावं तेवढं कमीच कधी कोण कुठून येईल व कोणाला घेऊन येईल याची भीतीच मनात बसलेली पण येणाऱ्या नवीन वर्षात आपल्याला हे सगळं विसरून झालं गेलं विसरून जा आणि परत माणूस व्हा माणुसकी जपा माणसे जवळ करा माणसे जोडा असेच म्हणावे लागेल
कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याला एकमेका सोबत राहून एकमेकाला मदत करावीच लागेल इतक्या भयंकर काळात कोरणा योद्धा म्हणून कार्य केलेले कार्यतत्पर पोलिस डॉक्टर नर्सेस सर्व कर्मचारी वृंद सैनिक बनून अविरत सेवा दिलेली आहे शहरातील नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असेल सर्वांनी आपापले कार्य उत्तम रीतीने केलेलेच आहे अशा या काळात सरकारने वेळोवेळी घेतलेले निर्णय अगदी योग्य होते देशाचा कारभार राज्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे कोरोना च्या काळात अन्नधान्य, पैसा, हॉस्पिटलची सर्व व्यवस्था, साधनाचा पुरवठा व त्यासाठी सर्वांनीच खूप खूप परिश्रम घेतलेले आपल्याला दिसून येते आता वेळ आली रे एकत्र येण्याची भितीने दूर नव्हे जाण्याची झालं गेलं सगळं विसरून जा माणूस व्हा बना आणि नवजीवन जगायला शिका नवीन वर्षात या जुन्या वर्षाची आठवण सुद्धा येणार नाही असे कार्य करत चला व जगाला एक आदर्श दाखवत चला महाराष्ट्राच्या मातीतील लेकरे आपण या आजाराला बळी पडू नका
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तसेच ती शुरविरांची गौरव गाथा असलेली भूमी आहे बलाढ्य अशा संकटावर मात करीत आपल्या पूर्वजांनी आपला महाराष्ट्र सुंदर गौरवशाली केला जीवन खूप मूल्यवान आहे सुंदर आहे म्हणून आपल्याला ते सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे गर्दीत जाणे टाळा, एका छोट्याशा चुकीमुळे आयुष्य गमावू नका तुम्ही तुमच्या जीवनरूपी गाडीचे ड्रायव्हर आहात चालक आहात जागृत राहा आयुष्याची खरी किंमत बेडवर पडलेल्या आपल्या मित्राला विचारा कष्टाला भिऊ नका कामाला लाजू नका नव तरुणांनो मित्रांनो आपल्या देशात जेवढे कार्य करायचे आहे ते करा पण परदेशात जाऊन विकृत संस्कृती, विकृत आजार, इथे आणू नका असेच म्हणावेसे वाटते नवीन वर्षाचे स्वागत नवीन कल्पना नवीन विचार सकारात्मक कार्य सकारात्मक उपक्रमाने करा जागे व्हा झालं गेलं विसरून जा माणूस बना नवीन संकल्प करा ध्येय निश्चित करा व त्या ध्येयाकडे वाटचाल सुरू करा यश आपलेच आहे नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदी सुखी समृद्धी व प्रगतीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
धन्यवाद।