प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब तालुक्यातील वाकडी आणि हावरगाव हद्दीत पारधी समाजाच्या कार्यक्रमाला सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत हजारो लोक एकत्र आले होते.याप्रकरणी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या व्यक्तीवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली. कलम 188 भादवीसह महाराष्ट्र कोव्हिडं 19 उपाययोजना अधिनियम 2020 कलम 11 सह कलम 51 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाला तरी कार्यक्रम सुरूच असल्याची माहिती मिळाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून हा कार्यक्रम सुरू असून बाहेरील जिल्ह्यातूनही लोक आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तब्बल 16 हजार स्क्वेर फूट मंडपात हा कार्यक्रम सुरू असून दिवस रात्र डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ राजस्व न्यूजच्या हाती लागला आहे.मात्र या कार्यक्रमास घेण्यास याना पाठीशी घालणारे अधिकारी कोण?हा कार्यक्रम कसा घेतला जाऊ शकतो व यावर वचक कोण ठेवणार? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे..त्याचबरोबर अनेक हलगटांची कत्तल केल्याचंही व्हिडिओ मधून समोर आलं आहे. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवल्याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल झाला तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का हा मोठा अनुत्तरित प्रश्न आहे..