अक्कलकोट प्रतिनिधी –
मागील अनेक महिन्या पासुन संपूर्ण जगात कोरोना सारखी महामारी असताना गेली ८ महिने प्रत्येक राज्य शासनाने लोकडाऊन जाहीर केले होते. अश्या काळात महावितरणाचे बील हे अंदाजे रिडींग नुसार अव्वा ते सव्वा आकारण्यात आले आहे तरी त्याच धर्तीवर ग्राहकाचे विज कनेक्शन खंडित करण्यात येत आहे तरी वीज खंडित करणे तूर्तास थांबवावे व ज्या ग्राहकास मोठया प्रमाणात वीज आकारणी आली आहे त्यांना बिल भरणेसाठी मुदतवाढ द्यावी
जास्त आकारणी झालेल्या ग्राहकाची मीटर तपासणी करून त्यांना योग्य आकारणीचे बिल देण्यात यावे
अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महावितरण कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उपअभियंता संजीवकुमार म्हैत्रे यांना देण्यात आले याप्रसंगी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखाबे,शहर अध्यक्ष प्रसाद माने, रिपाइं तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाडशुभम मडिखांबे,सुरेश गायकवाड,बुद्धभूषण गजधाने,राष्ट्रवादीचे प्रथमेश पवार,प्रदीप गायकवाड, विजयकुमार गायकवाड व अन्य उपस्थित होते
