अक्कलकोट

अक्कलकोट बातमी फोटो

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दोड्याळ ता.अक्कलकोट येथे लॉकडाउन काळात आपले रोजगार बुडून घरी बसलेल्या गरजू नागरिकांना तरुण मित्रांनी एकत्र येत संसारोपयोगी आठ साहित्याचे किटचे आज वाटप करण्यात आले.याकामी मल्लिनाथ करपे,लालचंद नडगम,दरेप्पा बिराजदार,कल्याणी पाटील,कलप्पा मंगरुळे,देविदास नडगम,दिलीप नडगम,राहुल गायकवाड,राहुल नडगम,अतिक बागवान,तौफिक मुल्ला,राहुल जाधव यांच्या संकल्पनेतून व अर्थसहाय्यातुन सदर किट वाटण्यात आले.याकामी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विशेष सहकार्य केले.दोड्याळ येथे आर्थिक दुर्बल अशा गटातील शंभर कुटुंबाना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्यात आले.ज्यात गहू,तांदूळ,साखर,तेल यासह एकूण आठ वस्तूंचा संच देण्यात आला.सदर वाटप हे नागरिकांत योग्य अंतर ठेवून करण्यात आले.यामुळे इथल्या नागरिकांनी सोय होण्यास मदत झाली आहे.या उपक्रमाचे दोड्याळ येथे समाधान व्यक्त होत आहे

Related posts