उस्मानाबाद  तुळजापूर

युवती संपर्क अभियान दौऱ्यादरम्यान नळदुर्ग येथे युवती सेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

सौ. कल्पना मोरे-रोचकरी
तुळजापूर/प्रतिनिधी.

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे धाराशिव जिल्ह्यातील युवती संपर्क अभियानासाठी सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान नळदुर्ग येथे बैठकीसाठी आलेल्या शिवसेना युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील युवतींचे संगठन मजबूत करण्यासाठी अभियान दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यादरम्यान उमरगा-लोहारा येथील बैठक संपन्न करून तुळजापूर ला जात असताना युवती सेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवती सेनेच्या राज्य सचिव मा. दुर्गाताई शिंदे-भोसले, सहसचिव – मा. अश्विनीताई पवार, युवासेना कॉलेज कक्ष समन्वयक मा. गीताताई कदम, तसेच धाराशिव युवासेनेचे जिल्हाप्रमुख ताठ नगरसेवक मा. अक्षय ढोबळे यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींकडून उपस्थित शिवसैनिकांमधला जोश पाहून सर्वांचे आभार मानले.

यावेळी युवासेनेचे मा. तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, ग्राहक संरक्षण कक्ष चे तालुकाप्रमुख राजेंद्र जाधव उर्फ मेजर, किरण दुसा, जाधव शशिकांत, राहुल घोडके, गजानन हळदे, आकाश घोडके, जमनसिंग ठाकूर, राजेंद्र कनकधर, महादेव फरताळे, सरफराज शेख, अमजद शेख, अक्षय नितळी यांच्यासह अनेक शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.

Related posts