Blog

जागतिक जल दिन – जलसंपदा सुरक्षा ; काळाची गरज.

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक – श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

===========================================================================

मित्रांनो आज 22मार्च ,जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व, नदया, सरोवरे, तळे शेत तळे यांचा योग्य वापर करावा व पाण्याचे योग्य नियोजन करावे पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरावे पाणी म्हणजेच आपले जीवन आहे नदीचे महत्त्व, नद्यांची स्वच्छता या बाबतीत जागरूकता करण्यासाठी शब्दरूपाने केलेला एक छोटासा प्रयत्न .

जल म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जीवन होय पाण्याशिवाय आपण सजीव जगू शकत नाहीत पाणी आहे म्हणून आपण आहोत म्हणतात ना’ जल हे तो कल है’ आपला भविष्यकाळ सुखी, आनंदी, समृद्ध बनवण्यासाठी, सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे पाण्याचा एक एक थेंब मूल्यवान आहे याची प्रचिती आपल्याला कडक उन्हाळ्यात येते माणसालाच काय पण पशु-पक्षी प्राण्यांना सुद्धा उन्हाळ्याच्या कडकअशा वातावरणात पाण्यासाठी भटकंती करावी लागते तरी पाणी मिळत नाही याचे कारण शोधल्यावर आपल्याला उत्तर मिळते ते असे,

मानव आपल्या स्वार्थासाठी ,लाभासाठी, भरमसाठ वृक्षतोड करीत आहे, झाडांची, जंगले वने नष्ट करीत आहे,व त्या ठिकाणी मोठमोठे कारखाने, सिमेंटची जंगले तयार होताना दिसत आहेत पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वर्षापासून मोठ मोठी झाडे होती संपूर्ण रस्ते सावलीने झाकलेले असायचे !एकदा का बस किंवा रेल्वे त्या घनदाट रस्त्याने शिरली की बोगदया सारखे वृक्ष व त्याचे सौंदर्य दिसायचे तेच सौंदर्य रात्रीच्या प्रवासात तर खूपच मनमोहक दिसून येत असे पूर्वी मामाच्या गावाला जाताना पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया असं आनंदाने म्हणत प्रवास होत असे पण आज मामाचा गाव बदलला आणि रस्ता ही बदलला त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे!

वृक्षतोड सतत होत असल्यामुळे पावसाचे प्रमाण हळूहळू घटत आहे व पाण्याचे प्रमाण कमी होत आहे एकदा वृक्ष तोडल्यानंतर परत तसेच वृक्ष येण्यासाठी किमान चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो हाच काळ बिना पावसाचा जातो किंवा कमी पावसाचा होतो त्या वर्षी पिकांचे तर सोडाच पण पशु-पक्षी प्राण्यांबरोबरच माणसांचे सुद्धा खूप हाल होतात यालाच कोरड़ा दुष्काळ म्हणून जाहिर करत असत शहराचे औद्योगीकरण झाल्यामुळे सर्व शहरात किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते परंतु खेड्यापाड्याचे खूप खूप हाल होतात ते आपण पाहिले आहे अनुभवलेले आहे व पुढे ही हीच अवस्था राहणार आहे फक्त वृक्ष लावा वृक्ष जगवा अशा घोषणा दिल्याने किंवा फक्त लिहित गेल्याने हा प्रश्न सुटणारा नाही तर वृक्षारोपण करणे त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे तसेच आपल्या देशातील प्रत्येक जण, राज्यातील तसेच प्रत्येक जिल्ह्यातील मोठमोठे बांध, त्याची दुरुस्ती, त्याची खोली खोलीकरण, पाणी आडवा पाणी जिरवा, अशा योजना करून पाण्याची पातळी पाण्याचा साठा वाढवता येतो तसे कार्यही काही सामाजिक संस्था करीत असतात असताना दिसत आहेत खरोखरच हे कार्य खूप मोलाचे व अभिनंदनीय आहे प्रत्येक जिल्ह्यातील नद्या व त्या नद्यांची सुरक्षितता तसेच नद्यांचे शुद्धीकरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची खरी गरज आहे

नद्या म्हणजे देशातील रक्तवाहिन्या आहेत ज्या प्रमाणे आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचे कार्य असते अगदी तेच कार्य या नद्या आपल्या देशांमध्ये करतात नदीची स्वच्छता हे कार्य खूप मोठे आहे आणि ते सर्वांनी मिळून करावयाचे आहे नद्यांमध्ये कचरा न टाकने, प्लास्टिक बॉटल ,प्लास्टिक कॅरीबॅग ,इतर वस्तू टाकण्यास बंदी घातली पाहिजे गणपती विसर्जन देवी,देवतांचे विसर्जन तसेच त्यासोबत जमा केलेले निर्माल्य हे नदीच्या पात्रात टाकू नये जसे आपण पृथ्वीवर राहतो तसेच हजारो जीव हजारो वर्षापासून पाण्यात राहत असतात त्यांचे जीवन हेच पाणी असते जलचर हे पाण्यातच राहतात व पाण्याचे शुद्धीकरण करतात हजारो जलचर जीव हे पाण्यामध्ये राहतात त्यांच्या सुरक्षिततेची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे! शहरांच्या औद्योगिकरणामुळे कारखान्यातील केमिकल मिश्रित पाणी हे नदीत सोडले जाते व पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते मोठ्या प्रमाणावर होणारे जलप्रदूषण थांबवले पाहिजे तसेच कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित वायूंमुळे वायुप्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे जागतिक प्रदूषणाच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार जगामधे एकूण 30 शहरे अत्यंत धोकादायक आहेत त्यामधे आपल्या भारतातील वायुप्रदूषणामुळे दिल्ली, कोलकत्ता ,मुंबई, सारख्या एकूण बाविस शहराचा समावेश आहे

शहरात राहणे खूप धोकादायक बनत चालले आहे मोलाचे पाणी, अनमोल पाणी, जीवन म्हणजे पाणी! पाणी वाचवा ,पाणी वाढवा ,पाण्याचा अपव्यय टाळा! असंच सांगायची वेळ येत आहे आपणा सर्वांनी आज पर्यंत पाण्याचा दुष्काळ पाहिलेला आहे अनुभवला सुद्धा आहे विशेषता ग्रामीण भागात तर पाण्यासाठी खूप खूप हाल होताना आपण पाहिले आहे,अनुभवले आहे एक एक किलोमीटर वरून डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन जाणारे पुरुष महिला आपण बघितलेल्या आहेत सायकल वरून पाणी आणणाऱ्या महिला भगिनी लहान-थोर आपण बघितलेले आहेत पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने केला पाहिजे थोडक्यात पाणी बचत करणे म्हणजेच पाणी निर्माण करणे होय थेंबे थेंबे तळे साचे तळे असे म्हणतात ते काही खोटे नव्हे

पाण्याचा उपयोग योग्य व चांगल्या प्रकारे केला पाहिजे पाण्याचा दुरुपयोग टाळला पाहिजे व हे आपण आपल्या स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे प्रत्येक घरातील नळाला तोट्या बसवलेल्या पाहिजेत आवश्यकता नसल्यास तोट्या बंद केल्या पाहिजेत आंघोळीसाठी ,गाड्या धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, जनावरे प्राणी धुण्यासाठी, आपण पाणी वापरतो पण तेच पाणी जपून व काटकसरीने वापरले पाहिजे जसं आपण पैशाच्या बाबतीत काटकसर करतो अगदी तसच जलसंपदा म्हणजेच धनसंपदा आहे पृथ्वीच्या पोटातून हजारो फुटावरून आपण पाणी बाहेर काढतो त्याचे मूल्य केले पाहिजे निसर्गाने आपणाला अनमोल असे पाणी मोफत दिले आहे निसर्गातून ज्या गोष्टी मिळतात त्या आपल्यासाठी अनमोल असतात परंतु आपल्याला त्याचे महत्त्व लवकर कळत नाही अन्न-वस्त्र-निवारा, पाणी, हवा, विविध फळे, भाज्या, तसेच सर्व अनमोल पशुधन हे मानवा साठीच मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच लाभलेले धन आहे

म्हणून जलसंपदा हे निसर्गाने आपल्याला दिलेली जलसंपदा आहे ती आपण टिकवली पाहिजे आजच्या जागतिक जल संपदा दिनी आपणा सर्वांकड़ूंन हीच अपेक्षा

धन्यवाद।🙏🏻🙏🏻

Related posts