उमरगा

एकुरगावाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची स्पर्धा संपन्न.

किशोर औरादे / उमरगा तालुका प्रतिनिधी

दि.24 उमरगा तालुक्यातील एकुरगा वाडी येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या वतीने हनुमान मंदिर एकुरगावाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची बाॅल पासिंग स्पर्धा घेण्यात आली .

या स्पर्धेमध्ये एकूण तीस महिलांनी भाग घेतलेला होता यामध्ये प्रथम जिजाबाई जाधव ,द्वितीय नागराबाई मोरे, तृतीय शकुंतला औरादे, विजेत्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला . या कार्यक्रमासाठी ग्राम सुपरवायझर पल्लवी औटी अंजुम शेख, शितल सुरवसे यांनी प्रशिक्षका म्हणून कामगिरी बजावली.

स्पर्धा झाल्यानंतर पल्लवी औटी यांनी महिलांना आरोग्य विषयी माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा कार्यकर्ती सरोजा औरादे, अंगणवाडी कार्यकर्ती छाया जाधव, आशा पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Related posts