करमाळा

करमाळा तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते येणार का एकत्र की भाजपा दाखवणार चमत्कार !

( उमेश पवळ ) करमाळा तालुक्यातील राजकारण हे समस्त महाराष्ट्र राज्य जाणून आहे
. महाराष्ट्र राज्य सरकार हे तिन पक्षाचे स्थापन झालेले असुन यामध्ये प्रामुख्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस चे पदाधिकारी मनापासुन महाविकास आघाडीचे काम करत आहेत.


करमाळा तालुका हा गटातटाने पोखरलेला आहे. बागल गट,पाटील गट,शिंदे गट ,जगताप गट,सांवत गट हे गट तालुक्यातील राजकीय वातावरण निर्माण करीत असतात.
करमाळा तालुक्यातील आजी माजी आमदार मनापासून एकत्र येणार का?हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत दिसणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील ,आदिनाथ कारखान्याचे संचालिका रश्मी बागल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय मामा शिंदे हे विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. राजकीय डावपेच करून भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे चमत्कार करणार का ?
पुणे पदवीधर मतदार संघात भाजपचे कार्यकर्ते बळ हे मोठ्या प्रमाणावर आहे. करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण हे तापणार आहे .या निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणूक लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी हि कशी व्युहरचना आखण्यात यशस्वी होणार आहे हे महत्त्वाचे आहे.
करमाळा महाविकास आघाडीत पुणे पदवीधर निवडणुकीत मनापासून काम करणार की आप आपल्या गटाची ताकत दाखविण्यासाठी आपल्याच महाविकास आघाडीची वाट लागणार हे निवडणूक झाल्यावर दिसून येणार आहे.

Related posts