Blog

आयुष्याच्या जात्यावर दळताना…

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर

आपले जीवन किती सुंदर आहे बघा जीवनात किती आनंद आहे प्रेम आहे वात्सल्य आहे हे आपल्याला घेता आले पाहिजे आयुष्य आपल्याला सर्व काही शिकवते वरील चित्रात जीवनातील आनंद घेताना पती-पत्नी आपल्याला दिसत आहेत संसाराच्या नवीन जोडप्या पासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आयुष्याचा गाडा ओढलेला असतो पती-पत्नीने एकमेकांना साथ देऊन आपला संसार आपले कुटुंब प्रेमाने वाढवलेले ,चालवलेले असते म्हणतात ना पती आणि पत्नी हे जीवन रुपी रथाची दोन चाके आहेत आणि या दोन्ही चाकाच्या समानतेने हा रथ चालत असतो एका विचाराने एका निर्णयाने एक मताने सहकुटुंब सहपरिवाराचा हा रथ चालत असतो एक चाक कोलंमडता कामा नये म्हणून दोन्ही चाकांनी काळजी घ्यायला हवी.

अगदी तसंच आपले आयुष्य हे एक जाते आहे ते जात्यासारखे काम करते या आयुष्याच्या जात्यावर सगळी दुःख संकट भरडली जातात व त्यातून प्रेमाचे आनंदाचे पीठ बाहेर पडते व आपण सुखी होतो आयुष्याच्या जात्यावर दळताना दोघांनी एकमेकांना साथ द्यायची असते तरच आपले जीवन सुखकर होते भांडण-तंटे हेवे-दावे सगळे कसे खड्यासारखे जा त्यातून बाहेर पडतात आणि प्रेम व आनंदाला वाट मोकळी करून देतात वरील सुंदर चित्रातून आयुष्याचे भागीदार बनलेले पती-पत्नी आपल्या आयुष्याच्या जात्यावर सगळे दुःख भरडली जात आहेत व त्यातून प्रेम वाट्याला येत आहे असे दिसते प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि परिश्रमी असले पाहिजे तरच आपले जीवन सुखी होईल.

Related posts